आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Out Of Injury, Out Of Work At Supermarket Due To Coronavirus; The England Team Reached The Final With The Best Innings

लक्षवेधी:दुखापतीमुळे बाहेर, काेराेनामुळे सुपर मार्केटमध्ये नाेकरी; सर्वाेत्तम खेळीतून इंग्लंड संघाला गाठून दिली फायनल

ऑकलंड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंभीर दुखापत आणि त्यानंतर काेराेना महामारीमुळे रग्बीची खेळाडू तात्याना हर्डला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. यामुळे तिला संघातून बाहेर पडावे लागले. तसेच काेराेना महामारीमुळे आर्थिक अडचणींना समाेरे जावे लागले. मात्र, तिने माेठ्या धाडसाने या सर्व परिस्थितीवर मात केली. यातून तिने सुपर मार्केटमध्ये नाेकरी केली. यातून आपल्या आर्थिक अडचणींना तिने दूर केले. मात्र, हे करत असताना तिने आपल्या सरावात खंड पडू दिला नाही. यातून तिला रग्बी खेळातील आपल्या कामगिरीचा दर्जा सातत्याने उंचावता आला. यामुळे तिला पुन्हा इंग्लंड संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिची विश्वचषकासाठी संघात निवड झाली.

याच संधीला सार्थकी लावताना २७ वर्षी तात्यानाने सर्वाेत्तम खेळीतून इंग्लंड महिला संघाला विश्वचषकाची फायनल गाठून दिली. इंग्लंड महिला संघाने विजयी माेहीम कायम ठेवताना वर्ल्डकपच्या फायनलचा पल्ला गाठला. यामध्ये तात्यानाचे याेगदान माेलाचे ठरले. येत्या १२ नाेव्हेंबर राेजी इंग्लंड संघ विश्वविजेत्याचा बहुमान मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. येत्या शनिवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल हाेणार आहे. पहाटे ३ वाजेपासून नाेकरी; दुपारी कसून सराव : तात्यानाला काेराेना महामारीदरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, यावर मात करण्यासाठी तिने अनेक ठिकाणी पार्ट टाइम कामाचा शाेध घेतला. तिला सुपर मार्केटमध्ये नाेकरी मिळाली. या ठिकाणी तिला पहाटे ३ ते सकाळी ११ वाजेपर्यंत काम करावे लागत हाेते. यादरम्यान आठवडाभर तिला हे काम करावे लागत हाेते.

बातम्या आणखी आहेत...