आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Oval Invisibles Winner For Second Time, All rounder Marijane Kep Named Player Of The Match

महिला हंड्रेड:ओव्हल इनव्हिसिबल्स दुसऱ्यांदा विजेता,  अष्टपैलू मरिजाने केप ठरली प्लेअर ऑफ द मॅच

लॉडर्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्हल इनव्हिसिबल्सने महिला द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघाला ५ गडी राखून पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. लीगच्या पहिल्या सीझनमध्येही अंतिम फेरीत हेच दोन संघांमध्ये लढत झाली होती. त्यावेळीही ओव्हलने विजेतेपद पटकावले होते.

नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या सदर्न ब्रेव्ह संघाने िनर्धारित १०० चेंडूंत ७ गडी गमावून १०१ धावा केल्या. भारतीय फलंदाज स्मृती मानधना (१७) आणि डॅनियल व्हॅट (१५) मोठी धावसंख्या उभारू शकल्या नाहीत. सोफिया डंकलेने सर्वाधिक २६ धावा केल्या. संघाच्या पाच खेळाडूंनी २५ चेंडूंत २३ धावा केल्या. ओव्हल इनव्हिसिबल्सने ६ चेंडू आणि ५ गडी राखून विजयी लक्ष्य गाठले.

प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या मरिजाने केपने सर्वाधिक नाबाद ३७ धावा केल्या. ३२ वर्षीय मरिजाने गेल्या दोन वर्षांत चौथ्यांदा विविध लीगमध्ये अंतिम फेरीत सामनावीर किताबाची मानकरी ठरली आहे.

मानधना २०० पेक्षा अधिक धावा करणारी एकमेव फलंदाज : सदर्न ब्रेव्ह संघाकडून खेळणारी भारतीय फलंदाज स्मृती मानधना ही संघासाठी २०० पेक्षा अधिक धावा करणारी एकमेव खेळाडू ठरली आहे.

मानधनाने ८ सामन्यांमध्ये १५१.७९ च्या स्ट्राइक रेटने २११ धावा केल्या.

पुरुष हंड्रेड : ट्रेंट रॉकेट्स प्रथमच विजेता ट्रेट रॉकेट्सने पुरुष द हंड्रेडच्या अंतिम सामन्यात मॅँचेस्टर ओरिजिनल्सला २ गडी राखून पराभूत केले. ट्रेंट संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मँचेस्टरने १०० चेंडूंत ९ बाद १२० धावा केल्या होत्या. प्लेअर ऑफ द मॅच सॅम कूकने सर्वाधिक ४ बळी घेतले. अॅश्टन टर्नरने सर्वाधिक २६ धावा केल्या. ट्रेंटने ८ गडी गमावले परंतु २ चंेंडू राखून १२१ धावांचे विजयी लक्ष्य गाठले.

बातम्या आणखी आहेत...