आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यामुळेच बीडमधील अविनाश साबळेसारखे गुणवंत युवा खेळाडू जागतिक स्तरावर ठसा उमटवत आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना आर्थिक व मानसिक पाठबळ देण्याची गरज आहे, अशा शब्दांत पद्मश्री ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी खेळाडूंचे खास कौतुक केले. त्यांच्या हस्ते आज शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित राज्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती बाबत काय वाटते ? गुणवंत युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करत औरंगाबादला नवीन ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळेच पुणे, मुंबई, काेल्हापूर, नागपूरपाठाेपाठ औरंगाबादने स्पोर्ट्स हब म्हणून आपला ठसा उमटवला आहे. मात्र या ठिकाणी स्वतंत्र खेळासाठी असलेल्या दर्जेदार मैदानाचा अभाव आहे. त्यामुळे निश्चितपणे युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला काही प्रमाणात ब्रेक लागत आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे युवांच्या गुणवत्तेला चालना मिळेल.
खेळाडूंच्या कामगिरीबाबत काय मत? राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. त्यामुळेच अविनाशसारख्या धावपटूने ऑलिम्पिक ट्रॅकवर आपला ठसा उमटवला. यासारख्या अनेक युवा खेळाडूंना आता पाठबळ देण्याची गरज आहे. यातून निश्चितपणे महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे असंख्य युवा खेळाडू दिसतील. महाराष्ट्रीय हाॅकीची सध्याची स्थिती? पंजाबपाठोपाठ राजस्थान, हरियाणामध्ये मोठ्या संख्येत हॉकीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी आहेत. मात्र त्यामानाने महाराष्ट्रामध्ये अत्यंत चिंताजनक असे चित्र आहे. हॉकी अकादमीच्या अभावाने खेळाडूंच्या गुणवत्तेला ब्रेक लागला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे हॉकीपटू राष्ट्रीय संघासाठी अपयशी ठरत आहेत. यासाठी राज्य शासन व संघटनांनी पुढाकार घेऊन अकादमी सुरू करण्याची गरज आहे.
आयओए नेतृत्वाबाबत काय वाटते? जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या धावपटू पी. टी. उषा यांच्याकडून आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) नेतृत्व करताना दर्जेदार कामाची आशा आहे. मैदानावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी ठसा उमटवला. मात्र त्यांना आता प्रशासनामध्ये ठसा उमटवण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.