आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • Pakistan Helpless Before Bhuvneshwar Kumar's Bowling, Latest News And Update

भुवनेश्वरने उडवला पाकचा खुर्दा:भुवीने रिझवानवर अंकुश ठेवला, बाबरला बाउंसरने तंबूत पाठवले; डेथ ओव्हर्समध्ये केली शानदार गोलंदाजी

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

टीम इंडियाचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या संघात नाही. त्यामुळे आशिया चषकात त्याची उणीव भासेल. त्याच्या जागी किमान मोहम्मद शमीला तरी संघात स्थान मिळायला हवे होते. या गोष्टींवर आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. पण भारताने बुमराह व शमीच्या गैरहजेरीत या स्पर्धेत पाकला 5 गड्यांनी धूळ चारली. यात पॉवरप्लेमध्ये कुण्या खेळाडूने पाकच्या फलंदाजांना चुका करण्यासाठी भाग पाडून त्यांच्यावर अंकुश मिळवला असेल तर होता आपला भुवी म्हणजे भुवनेश्वर कुमार.

पाकला ऑल आउट करण्यात महत्वाची भूमिका

कोणत्याही T20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 4 षटकांत 6.50 च्या इकॉनॉमीने 26 धावांत 4 बळी घेणे ही भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. भुवीने सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाचा संघाचा कर्णधार बाबर आझमची शिकार केली. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयाची पटकथा लिहिणाऱ्या बाबरला 9 चेंडूत अवघ्या 10 धावा करता आल्या. बाबरशिवाय भुवनेश्वरने शादाब खान, आसिफ अली व नसीम शाह यांचेही विकेट्स घेतले.

पाकविरुद्ध पॉवरप्ले व डेथ ओव्हर्समध्ये विकेट्स घेणाऱ्या भुवीला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात बुमराहचा जोडीदार म्हणून पाहिले जाऊ शकते.
पाकविरुद्ध पॉवरप्ले व डेथ ओव्हर्समध्ये विकेट्स घेणाऱ्या भुवीला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात बुमराहचा जोडीदार म्हणून पाहिले जाऊ शकते.

बाबरवर पहिल्या चेंडूपासूनच दबाव

बाबर आझमने पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर चौकार मारला. पण त्याला पूर्ण आत्मविश्वासाने भुवीचा सामना करता आला नाही. भुवनेश्वरने आपल्या अनुभवाच्या बळावर बाबरला सळो की पळो करून सोडले. त्याला शॉर्ट पिच बॉलने खूप त्रास दिला. बाबरला माहीत होते की भुवीला सुरुवातीला संधी मिळाली तर तो विकेट घेईल. त्यानंतर भुवी आपल्या कोट्याचे दुसरे व डावाचे तिसरे षटक करायला आला.

तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाबर अस्वस्थ दिसला. चौथा चेंडू त्याने बॅटने अडवला. भुवीला मिळालेल्या अतिरिक्त बाऊन्सवर नियंत्रण ठेवण्यात त्याला अपयश आले. जेव्हा चेंडू बॅटच्या वरच्या काठाने शॉर्ट फाइन लेगकडे गेला, तेव्हा पाकिस्तानी चाहत्यांच्या गोटात निराशा पसरली.

येथे कोणताही भारतीय क्षेत्ररक्षक चूक करणार नाही हे त्यांना माहीत होते. बाबर आझम अर्शदीपकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना भारतीय प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला. भुवनेश्वर कुमार व टीम इंडियाचे खेळाडू आनंदात जल्लोष करत होते. बाबरला स्वस्तात बाद करून संघाने अर्धा विजय मिळवल्याचे सर्वांना ठावूक होते.

रिझवानला सावरण्याची संधीच दिली नाही

 • पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही.
 • दुसरा चेंडू मोहम्मद रिझवानने पूल केला. पण तो चुकला आणि चेंडू मांडीवर धडकला. भारताने जोरदार अपील केली. अम्पायरने आउट दिले टीम इंडिया व भारतीय चाहते आनंदाने नाचले. पण रिझवानने डीआरएसची मदत घेतली. तिथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही. कारण, चेंडू यष्ट्यांवर लागत नव्हता.
मोहम्मद रिझवानला पहिल्या षटकात एलबीडब्ल्यू आउट केल्याची अपील करताना भुवनेश्वर कुमार.
मोहम्मद रिझवानला पहिल्या षटकात एलबीडब्ल्यू आउट केल्याची अपील करताना भुवनेश्वर कुमार.
 • तिसऱ्या चेंडूवर रिझवानने एक धाव घेवून सुटकेचा निश्वास सोडला.
 • चौथ्या चेंडूवर स्ट्राइक बाबरकडे आली. त्यांनी पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने टोलवत चौकार पटकावला.
 • बाबरने पाचव्या चेंडूवर आणखी एक धाव वसूल केली. शेवटच्या चेंडूवर रिझवान स्ट्राइकला आला.
 • भुवीने आणखी एक शानदार चेंडू टाकला आणि कर्णधार रोहित शर्माने कॅचसाठी अपील केली. पण यष्टीरक्षक दिनेश कार्तिक शांत होते. अम्पायरने आउट दिले नाही. पण अम्पायर षटक संपल्याचा इशारा करत असतानाच रोहितने डीआरएस घेतला. आपल्याला चेंडू बॅटला लागल्याचा आवाज आल्याचा त्याने अम्पायरच्या लक्षात आणून दिले.
 • एका विकेटची संधी अगोदरच हातातून सुटल्यामुळे भारतीय संघाची दुसरी संधी गमावण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे रोहितने रिव्ह्यू घेतला. पण नशिबाने भारताची साथ दिली नहाी. रीप्लेमध्ये चेंडूचा बॅटला स्पर्श झाल्याचे दिसले नाही.
 • अशा प्रकारे एक यशस्वी व एक अपयशी रिव्ह्यू, एक शानदार शॉट व 4 जबरदस्त चेंडूंसह पहिले षटक संपले.

भुवीपुढे पाकचे धडाकेबाज सलामीवीर पडले फिके

पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवान पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मोठे फटके खेळून गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात त्याचा हातखंडा आहे. पण त्याची ही रणनीती भुवनेश्वर कुमारसमोर कामी आली नाही.

पाकिस्तानकडून सलामीला आलेला रिझवान 42 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. त्यात त्याचा स्ट्राइक रेट 102 होता. रिझवानच्या संथ खेळीचे दडपण पाकच्या उर्वरित फलंदाजांवर आले. त्यांनी झटपट धावा काढण्याच्या नादात विकेट्स गमावल्या. शेवटी, परिणाम असा झाला की पाक संघ संपूर्ण 20 षटके देखील खेळू शकला नाही. त्यांना सर्वबाद 147 धावांच करता आल्या.

सामन्यात विकेट घेतल्यानंतर केएल राहुल व विराट कोहलीने भुवनेश्वरचे कौतुक केले.
सामन्यात विकेट घेतल्यानंतर केएल राहुल व विराट कोहलीने भुवनेश्वरचे कौतुक केले.

भुवनेश्वरने डेथ ओव्हर्समधील दोष केला दूर

भुवनेश्वर सामन्याच्या सुरूवातीला खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीचा फायदा घेतो. पण पॉवरप्लेमध्ये त्याला धावांवर अंकुश ठेवता येत नाही, असा आरोप भुवनेश्वरविषयी केला जात होता. पाकविरोधात त्याने या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले. तिसऱ्या षटकात बाबरला बाद केल्यानंतर भुवीने 18 व्या व 20 व्या षटकांत पाकचे 3 गडी तंबूत धाडले.

बातम्या आणखी आहेत...