आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल खानने भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या वेगावर खरपूर समाचार घेतला. त्याने उमरानची खिल्ली उडवली आहे. नादिर अलीच्या यूट्यूब चॅनलवर सोहेल खान म्हणाला की, उमरानसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या देशातंर्गत क्रिकेटमध्ये अनेक आहेत. शोएब अख्तरचा सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की, शोएबचा गोलंदाजीचा रेकॉर्ड फक्त मशीन मोडू शकते. कोणत्याही बॉलरला त्याचा विक्रम मोडणे खूप कठीण आहे.
सोहेल म्हणाला की, काही सामन्यांमध्ये उमरानची बॉलिंग पाहिली आहे. तो चांगला गोलंदाज आहे. त्याचे चेंडूवर नियंत्रण आहे. पण पाकिस्तानी क्रिकेटमध्ये 150-155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचा भरणा आहे. शाहीन शाह, नसीम शाह, हरिस रौफ यांच्यासह अनेक वेगवान गोलंदाज आहेत. ज्यांच्याकडे 150-155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
शोहब अख्तरचा विक्रम मोडता येईल
उमरान हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 156 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. उमरानने एका मुलाखतीत सांगितले होते की, शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम मोडता येणार नाही असे कोणतेही कारण नाही. मात्र भारतासाठी चांगली कामगिरी करण्यावर त्याचे लक्ष आहे. शोएब अख्तरने 2003 च्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता आणि आज 20 वर्षांनंतरही कोणताही गोलंदाज त्याच्यापेक्षा वेगवान चेंडू टाकू शकलेला नाही.
पाकिस्तानी गोलंदाज सोहेल खान याने सांगितले आहे की, शोएब अख्तरचा विक्रम मोडणे सोपे नाही. त्याचा विक्रम फक्त त्याच्याइतकाच मेहनत करणारा वेगवान गोलंदाज मोडेल. तो वजन घेवून डोंगर दऱ्यात धावत असे. तो एका दिवसात 32 फेऱ्या पूर्ण करत असे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.