आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडने कसोटी मालिकेत पाकला त्याच्याच देशात धूळ चारली आहे. 3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने पाकचा 3-0ने पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ब्रिटीश संघाने तिसरी कसोटी 8 गड्यांनी आपल्या खिशात घातली. त्यांनी पहिली कसोटी 74 व दुसरी कसोटी 26 धावांनी जिंकली होती.
कसोटीच्या इतिहासात प्रथमच इंग्रजांनी पाकला त्यांच्याच देशात क्लीन स्वीप दिला आहे. दोन्ही देश मागील 68 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. इंग्लंडच्या संघाने 1961-62 मध्ये पहिल्यांदा पाकचा दौरा केला होता. तेव्हा इंग्लंडने 3 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. तर 2 सामने अनिर्णित राहिले होते.
तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत इंग्लंडला मंगळवारी विजयासाठी अवघ्या 55 धावा करायच्या होत्या. हे लक्ष्य त्यांनी पहिल्याच सत्रात प्राप्त केले.
कर्णधार बेन स्टोक्स व बेन डकैट नाबाद
कर्णधार बेन स्टोक्स 35 व बेन डकैट 82 धावांवर नाबाद राहिले. पाकच्या अबरार अहमदने शेवटच्या डावात 2 बळी घेतले. उर्वरित गोलंदाजांना एकही बळी मिळाला नाही. तत्पूर्वी, इंग्लंडला विजयासाठी 167 धावांचे आव्हान मिळाले होते. तिसऱ्या दिवशी सोमवारी स्टंप्सपर्यंत इंग्लिश संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 112 धावा केल्या होत्या. तेव्हा बेन डकैट (50) व बेन स्टोक्स (10) धावांवर नाबाद परतले होते.
दुसरीकडे, दुसऱ्या डावात इंग्लंडचा पहिला बळी 87 धावांवर पडला. ओपनर जॅक क्रॉले 41 चेंडूंत 41 धावा काढून तंबूत परतला. त्याचा बळी अबरार अहमदने घेतला. इंग्लंडला दुसरा झटकाही अबरार अहमदनेच दिला. त्याने रेहान अहमदच्या त्रिफळा उडवत त्याला तंबूत पाठवले. रेहानने 10 धावांवर बाद झाला. त्यावेळी इंग्लंडचा स्कोअर 97 वर होता.
पाकच्या दुसऱ्या डावात 216 धावा
बाबर-शकीलचे अर्धशतक
तत्पूर्वी, पाकने दुसऱ्या डावात 21/0 पासून खेळणे सुरू केले. बाबर आझम (54) व सऊद शकीलने (53) अर्धशतक केले. दोघांत 110 धावांची भागिदारी जाली. 54 धावांच्या खेळीसह बाबरचे एका वर्षात 1 हजार कसोटी धावा झाल्या. बाबरने पहिल्या डावात 123 चेंडूंवर 78 धावा केल्या.
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या रेहान अहमदने 5, जॅक लीचने 3 बळी घेतले. मार्ड वूड व जो रुटला प्रत्येकी 1 बळी मिळाला.
डेब्यू मॅचमध्ये 5 बळी घेणारा रेहान सर्वात तरुण गोलंदाज
इंग्लंडच्यावतीने डेब्यू करणारा स्पिनर रेहान अहमद कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 5 बळी घेणारा पहिला तरुण डेब्यूटांट बनला आहे. त्याने पाकच्या दुसऱ्या डावात 5 गड्यांना बाद केले.
ब्रूकने मोडला डेव्हीड गॉवरचा विक्रम
दोन दिवसांपूर्वीच हॅरी ब्रूकने शतक करून आपल्याच देशाचा फलंदाज डेव्हीड गॉवरचा विक्रम मोडला. तो पाकमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा कुटणारा इंग्लिश फलंदाज ठरला आहे. डेव्हीड गॉवरने 1983-84 मध्ये पाकविरोधात त्याच्याच देशात 449 धावा केल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.