आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानींवर भडकला शोएब अख्तर:कोहली आणि भारतीय संघाची बरोबरी कोणताच पाकिस्तानी खेळाडू करू शकत नाही-अख्तर

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोएब अख्तरने विराट आणि रोहितचे कौतुक केले होते, त्यानंतर पाकिस्तानात त्याच्यावर खूप टीका झाल्या होत्या

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आपल्या देशातील लोकांवर भडकला. अख्तरने एका मुलाखतीदरम्यान भारतीय संघ आणि विराट कोलहीचे कौतुक केले होते. अख्तर म्हणाला होता की, कोहलीचे कौतुक का करू नये ? सध्या कोणताच पाकिस्तानी खेळाडू कोहलीची बरोबरी करू शकत नाही.

काही दिवसांपूर्वी अख्तरने एका मुलाखतीदरम्यान कोहली आणि रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाचे कौतुक केले होते. यानंतर पाकिस्तानातून त्याच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अख्तर म्हणाला होता की, जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनी आकडे पाहावे आणि ठरवावं की, कोण चांगला खेळाडू आहे. सध्या विराट कोहली जगातील टॉप बॅट्समनपैकी एक आहे.

कोहली भारतीय असल्यामुळे कौतुक करू शकत नाही ?

शोएब यावेळी म्हणाला, ‘‘मला माहित नाही की, लोक का नाराज आहेत, त्यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आकडे पाहावे. कोहली भारतीय असल्यामुळे त्याचे कौतुक करू शकत नाही का ? कोहली सध्या असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने 70 शतके ठोकली आहेत. कोहलीसारखा दुसरा कोणी आहे का ? त्याने भारताला किती सीरिज जिंकून दिल्या. मी त्याचे कौतुक करू नये का ?’’