आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Paralympic Games Tokyo LIVE News Update; Singhraj Adhana Wins Bronze Medal In Shooting At Tokyo Paralympic

टोकियो पॅरालिम्पिक:भारताच्या खात्यात आले आठवे पदक, सिंहराज अधानाने 10 मीटर एयर पिस्टलमध्ये जिंकले कांस्य

टोकियो16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुबिना फ्रान्सिसने अंतिम फेरीत निराशा केली

टोकियो पॅरालिम्पिक खेळांचा आज सातवा दिवस आहे. आदल्या दिवशी भारताने 2 सुवर्णांसह 5 पदके जिंकली होती आणि आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. 39 वर्षीय सिंहराज अधाना यांनी 10 मीटर एअर पिस्तूल SH1 च्या अंतिम फेरीत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. अधाना 216.8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. चीनचा यांग चाओ 237.9 गुणांसह सुवर्ण जिंकण्यात यशस्वी झाला, तर चीनच्या हे हाँग जिंगला रौप्य पदक मिळाले.

खरेतर मनीषने एलिमिनेशन फेरीत सर्वांची निराशा केली आणि 135.8 गुणांसह बाहेर पडला. 18 वर्षीय मनीष नरवाल क्वालिफिकेशनमध्ये अव्वल ठरला होता पण अंतिम फेरीत संथ सुरुवात करून तो 7 व्या स्थानावरुन वर येऊ शकला नाहीत. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची संख्या आता 8 झाली आहे. ज्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य समाविष्ट आहेत.

रुबिना फ्रान्सिसने अंतिम फेरीत निराशा केली
सातव्या दिवसाच्या सुरुवातीला रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले. रुबीनाने पात्रता फेरीत चमकदार खेळ केला आणि 560 गुणांसह 7 वे स्थान मिळवून P2 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये रुबिनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण तिने अंतिम फेरीत निराशा केली. अंतिम फेरीच्या पहिल्या एलिमिनेशन फेरीत रुबीनाने 110.5 गुणांसह सहावे स्थान मिळवले. यानंतर, दुसऱ्या फेरीचा स्कोअर 128.5 होता आणि तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

बातम्या आणखी आहेत...