आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाविश्वातील अविस्मरणीय किस्से:1948  च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग भारतासाठी हाेता खडतर

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाने पहिल्यांदाच स्वतंत्र राष्ट्राच्या भूमिकेत तिरंगा ध्वज डाैलाने फडकवत ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. लंडनमधील १९४८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारीही संघाने सुरू केली हाेती. मात्र, याच दरम्यान फाळणीची घटना ताजीच हाेती. याच फाळणीचा माेठा परिणाम सगळ्याच गाेष्टींवर पडला. यात हाॅकीही समावेश आहे. यामुळे १९३६ बर्लिन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य खेळाडू नियाज, माे. शाहरुख, मलिक, अली शहा पाकिस्तानमध्ये निघून गेले. त्यानंतर भारतीय संघाच्या कसून तयारीमागे नवल टाटा यांचे माेलाचे याेगदान ठरले. तत्कालीन हाॅकी इंडियाचे अध्यक्ष असलेल्या टाटा यांनी सरावासाठी माेठ्या संख्येत स्पर्धा आणि सामन्यांचे आयाेजन केले. त्यामुळे मुंबईत सर्वाधिक सामने खेळत टीमने ऑलिम्पिकची तयारी केली. हाच उत्साह पाहून टाटा यांनी थेट विमानाने भारतीय हाॅकी संघ लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतीय संघातील सर्वाधिक खेळाडू दिल्ली, काेलकाता, मुंबई, मद्रास येथील हाेते. लखनऊ, मध्य प्रदेश आणि पंजाबच्याही काही खेळाडूंचा यात समावेश हाेता. त्यानंतर १९५६ मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने वेंबले स्टेडियमवर २५ हजार चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये यजमान इंग्लंडला ४-० ने धूळ चारली. भारताने विजयातून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला हाेता. भारताने स्वतंत्र राष्ट्राच्या भूमिकेतून सलग चाैथे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.

अविस्मरणीय : मोरारजी देसाई पारंपरिक पाेशाखात खेळले माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना कुस्ती, क्रिकेट, टेनिस खेळण्याचा छंद हाेता. ते अनेक वेळा मुंबईतील इंटर-जिमखानामध्ये क्रिकेट सामने पाहत हाेते. ते एकदा धाेती आणि गांधी टाेपी घालून खेळले हाेते.

७५ वर्षांतील अविस्मरणीय माेहिमा (१९८२-९२) -भारतीय क्रिकेट संघ १९८३ मध्ये विश्वविजेता ठरला हाेता. भारताने लाॅर्ड््सवर अंतिम सामन्यात विंडीजला ४३ धावांनी पराभूत केले हाेते. -खजानने १९८६ आशियाई स्पर्धेत २०० मी. बटरफ्लायमध्ये राैप्यपदक जिंकले हाेते. हे भारताचे १९५१ नंतर जलतरणात पहिले पदक ठरले हाेते. -भारताने १९८५ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट जिंकले हाेते. भारताने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला हाेता. -भारताने १९८७ मध्ये पाकसाेबत संयुक्तपणे क्रिकेट वर्ल्डकपचे यजमानपद भूषवले. ही स्पर्धा पहिल्यांदा इंग्लंडच्या बाहेर झाली. -भारतीय तिरंदाज लिंबारामने १९९२ एशियन चॅॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नाेंदवला. त्याने ३० मीटर इव्हेंटमध्ये ३५८/३६० गुणांसह सुवर्ण जिंकले हाेते.

बातम्या आणखी आहेत...