आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pawan Singh Became The First Indian To Be Selected In The Jury Committee Of The Olympic Games; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:‘पंच-प्रशिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर धोरणांची गरज’; पवनसिंह ठरले ऑलिम्पिक स्पर्धेच्या ज्युरी समितीत निवड होणारे पहिले भारतीय

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या पंचांवरील तटस्थ नसल्याची शंका दूर करण्याची गरज

कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंबरोबर प्रशिक्षक, खेळाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी अर्थात पंच हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घालवण्याबाबत आपल्याकडे अद्यापही जागरूकता नाही. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देत राष्ट्रीय पातळीवरील ठोस धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या ज्युरी अर्थात पंच समितीत निवड झालेले पहिले भारतीय व नग फॉर गोरी या देशातील अग्रगण्य नेमबाजी (शूटिंग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवनसिंह यांनी बुधवारी व्यक्त केले.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे संयुक्त महासचिव, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट‌्स फेडरेशन या जागतिक स्तरावर नेमबाजी खेळाचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या पंच समितीत (ज्युरी) सलग दोन वेळेस स्थान मिळवणारे पहिलेच व एकमेव भारतीय याबरोबरच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट‌्स फेडरेशनतर्फे भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेचे उत्तमरीत्या व्यवस्थापन करणारे अशी पवनसिंग यांची ओळख असून आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या १३० देशांमधून निवड करण्यात आलेल्या केवळ २० आंतरराष्ट्रीय पंचांपैकी ते एकमेव व पहिलेच भारतीय आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना सिंह म्हणाले, “पंच म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि म्हणूनच २००८ पासून मी या दृष्टीने तयारी करीत राहिलो. आरटीई ज्युरी (रिझल्ट टायमिंग स्कोअरिंग) ही यासाठीची सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर स्वप्नांची कवाडे माझ्यासाठी उघडी झाली. येत्या काही दिवसांत होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून सहभागी होण्यासाठी मी उत्साही असून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.’

ते पुढे म्हणाले की, “पंच म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांना यासंदर्भात उपलब्ध असलेली अपुरी माहिती मी जवळून अनुभवली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या देशातील पंच असतील तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. इतकेच नव्हे तर स्पर्धेच्या संदर्भात नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदल व आपली बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायची झाल्यास अनेक गोष्टींबाबत स्पष्टता या गोष्टी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरतात.”

आपल्या पंचांवरील तटस्थ नसल्याची शंका दूर करण्याची गरज
आपल्याकडे प्रशिक्षक असलेली व्यक्तीच पुढे पंच म्हणून काम करण्याकडे वळत असताना ती खेळा दरम्यान प्रत्येक खेळाडूसोबत तटस्थ असल्यासंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जातात. त्या दूर करण्याची गरज आहे. म्हणूनच पंच म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे माझे मत आहे. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देण्याची गरज आहे. प्रशिक्षक व खेळाडूंना त्या दृष्टीने तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक बदल महत्त्वाचे ठरतील, असेही सिंह यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...