आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये वर्कआउट:पीसीबी घेणार ऑनलाइन फिटनेस टेस्ट; खेळाडूंसाठी आहे अवघड वर्कआऊट

कराची3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • टेस्टमध्ये खेळाडू एका मिनिटात ६० पुशअप्स व ५० सिटअप्स करणार

लाॅकडाऊनमुळे सध्या अनेक माेठ्या स्पर्धांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे खेळाडूंच्या मैदानावरच्या सरावाला आता ब्रेक लागला आहे. याशिवाय लाॅकडाऊनमुळे खेळाडू घरीच बसून आहेत. त्यामुळे भविष्यात आयाेजित स्पर्धेत खेळताना खेळाडूंना गंभीर दुखापत हाेऊ शकते. हाच धाेका लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट मंडळ आता खेळाडूंची ऑनलाइन फिटनेस टेस्ट घेणार आहे. यामध्ये मंडळाशी करारबद्ध असलेल्या आणि ५० सिटअप्स करावे लागतील. पुशअप्सशिवाय खेळाडूंना त्यानंतर याे-याे टेस्टही द्यावी लागणार आहे. महामारीच्या संकटातही आपला फिटनेस कायम ठेवावा, यासाठी पीसीबीने खेळाडूंसाठी हा खास फिटनेस प्लॅन तयार केला. आगामी काळात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२०चा विश्वचषक हाेणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाेबत आता घरी बसूनच आपला फिटनेस कायम ठेवण्याचे माेठे आव्हान आहे. ही ऑनलाइन फिटनेस टेस्ट फायदेशीर ठरणार असल्याचे पीबीसीचे मत आहे. 

बीसीसीआयची माेहीम; करारबद्ध खेळाडूंसाठी प्लॅन

मुंबई : बीसीसीआयनेही आपल्या करारबद्ध खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी खास उपक्रम हाती घेतला. यासाठी बीसीसीआयने फिटनेसचा प्लॅन तयार केला. टीम इंडियाचे ट्रेनर निक वेब आणि फिजियाे नितीन पटेल हे दाेघेही या प्लॅनच्या आधारे खेळाडूंकडून मेहनत करून घेताना दिसतात. हे थलीट माॅनिटरिंग सिस्टीम (एएमएस)च्या माध्यमातून खेळाडूंना दिलेल्या वर्कआऊट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याचा निश्चित असा माेठा फायदा खेळाडूंना आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी हाेईल. त्यामुळे सर्वच खेळाडू यानुसार वर्कआऊट करत असल्याचे कर्णधार काेहली म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...