आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pickboll | India | Marathi News | Team India | Discovery Made By 3 Retired Americans To Play With Family; Now Reaches 70 Countries Including India

​​​​​​​पिकलबॉलचा वेगवान प्रसार:कुटुंबाने खेळावे यासाठी 3 निवृत्त अमेरिकींनी लावला शोध; आता भारतासह 70 देशांत पोहोचला

वॉशिंग्टन/दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे संमिश्र रूप आता 70 देशांत खेळले जाईल
  • दुहेरी खेळाडूही खेळू शकतात, 16 भारतीय राज्यांत 3000 खेळाडू

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणारे ९ खेळ अमेरिकेने जगाला दिले आहेत. याच कडीत आणखी एक नाव जोडले आहे. पिकलबॉल. टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे संमिश्र रूप धारण केलेल्या पिकलबॉलची माहिती असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातही याची कक्षा रुंदावताना दिसते आहे. भारतासह ७० देशांचे लोक हा खेळ खेळू लागले आहेत. हा खेळ ऑलिम्पिक गेम्समध्येही समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे. खेळ आयोजकांच्या दाव्यानुसार, पिकलबॉलला २०२८ मध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये याचा समावेश होऊ शकतो.

खेळाची सुरुवात १९६५ मध्ये वॉशिंग्टनच्या तीन मध्यमवयीन नागरिकांनी केली होती. एक दिवस हे तिघे बॅडमिंटन कोर्ट असलेल्या ठिकाणी निवांत बसले होते. परंतु,तेथे रॅकेटचा पूर्ण सेट नव्हता. तेव्हा त्यांनी छिद्र असलेल्या सामान्य आकाराचा प्लास्टिक बॉल आणि टेबल टेनिसच्या रॅकेटने खेळ खेळला. त्याचे नाव आपल्या श्वानावर ठेवले. ते त्याला पिकल्स नावाने हाक मारत होते. १९६७ मध्ये यासाठी पहिला कायमस्वरूपी कोर्ट बनवला. संपूर्ण कुटुंब एकाच वेळी खेळू शकेल,असा या खेळाचा उद्देश होता. आता सुमारे ४८ लाखांहून अधिक लोक हा खेळ खेळत आहेत. ही संख्या ५ वर्षांपूर्वी खेळणाऱ्या लोकांपेक्षा दुप्पट आहे.

विशेष बाब म्हणजे,अमेरिकेत आतापर्यंत १० हजारांहून जास्त ठिकाणी याच्या स्पर्धांचे आयोजन झाले आहे. ४ वर्षांत याच्या दोन राष्ट्रीय स्पर्धाही झाल्या आहेत. यूएस पिकलबॉलच्या पहिल्या प्रशासकीय मंडळाचे सीईओ स्टू अपसन यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीस हा खेळ भलेही ६५ वर्षांवरील लोकांनी खेळला, मात्र खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. ज्या लोकांना रिकाम्या वेळेत आनंद हवा आहे, त्यांच्यासाठी पिकलबॉल उपयुक्त आहे. खेळ पर्यावरणाच्या नुकसानीशिवाय सहज कळू शकेल व खेळला जाऊ शकतो. यूएस स्पोर्ट्‌स असोसिएशननुसार, २०१९ ते २०२० दरम्यान खेळ खेळणाऱ्यांची संख्या २३% वाढली.

हा सिंगल आणि डबल खेळाडूंमध्ये ४४ बाय २० चौ.फूट कोर्टावर खेळला जाऊ शकतो. भारतात हा खेळ २००६ मध्ये पोहोचला. त्यावेळी कॅनडाहून आलेल्या सुनील वालावाकर यांनी काही रॅकेट आणि बॉल मुंबईला आणले होते. आता संघटनाही झाली आहे. या संघटनेची पोहोच १६ राज्यांत आहे. भारतात याचे ३००० नोंदणीकृत खेळाडू आहेत.

बातम्या आणखी आहेत...