आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा कर्णधार नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष खाे-खाे संघाने शुक्रवारी पाचव्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. यासह महाराष्ट्राचा पुरुष संघ या स्पर्धेत सलग पाचव्यांदा चॅम्पियन ठरला. महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये दिल्लीवर ३८-२८ असा दहा गुणांनी विजय संपादन केला. यादरम्यान सलग चार वेळचा चॅम्पियन महाराष्ट्र महिला खाे-खाे संघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला. आेडिशा संघाने फायनलमध्ये विजय िमळवत महाराष्ट्राच्या साेनेरी यशाच्या माेहिमेला ब्रेक लावला. नाशिकच्या टेबल टेनिसपटू तनीषा काेटेचाने महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले. तिने फायनलमध्ये लक्षितावर विजय मिळवला. वसईची लांब पल्ल्याची धावपटू ईशा जाधव महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत चॅम्पियन ठरली. तसेच काेल्हापूरचा अनिकेत माने उंच उडीत कांस्यपदक विजेता ठरला. आैरंगाबाद क्रीडा प्रबाेधिनीच्या ऋषिप्रसाद देसाईने १०० मीटरमध्ये राैप्य जिंकले. ठाण्याची १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा महिला एकेरी गटात राैप्य विजेती ठरली. सायकलिस्ट पूजा, संज्ञा पाटील व विवानने प्रत्येकी एक राैप्य पटकावले.
कोल्हापूरचा अनिकेत माने याने उंच उडीत कांस्यपदक जिंकून खेलो इंडिया स्पर्धेतील स्वतःची पदकांची हॅट््ट्रिक पूर्ण केली. २०२१ मध्ये खेलो इंडिया स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले हाेते. गतवर्षी त्याने सुवर्ण कामगिरी केली होती.
आैरंगाबाद क्रीडा प्रबाेधिनीचा ऋषीप्रसाद ठरला पदार्पणात राैप्यपदक विजेता आैरंगाबाद क्रीडा प्रबाेधिनीच्या ऋषीप्रसाद देसाईने नुकत्याच झालेल्या राजस्तरीय स्पर्धेतील साेनेरी यशाची लय कायम ठेवत शुक्रवारी पाचव्या सत्राच्या खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. ताे पुरुषांच्या १०० मीटरच्या शर्यतीमध्ये राैप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने हे अंतर १०.६७ सेकंदात गाठले. यासह ताे पदार्पणात राैप्यपदक विजेता ठरला. प्रबाेधिनीच्या प्राचार्या प्रशिक्षक पुनम नवगिरे आणि सुरेंद्र माेदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे.
शेख शबनम कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी पाचव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला-पुरुष कुस्ती संघ रवाना झाला आहे. राज्याच्या कुस्ती संघ प्रशिक्षकपदी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. शेख शबनम यांची नियुक्ती झाली सलग पाचव्यांदा त्या राज्याच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे पुण्यातील बालेवाडी येथे प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडूंनी महाराष्ट्राला व भारताला पदके जिंकून दिली आहेत. त्यांच्या निवडीबद्दल राज्याच्या कुस्ती क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
याेगासन: आर्यन खरात-प्रणवला सुवर्णपदक महाराष्ट्राच्या मुलांनी योगासनच्या अखेरच्या दिवशी कलात्मक दुहेरी प्रकारात १ सुवर्ण व १ रौप्य पटकावून दबदबा कायम ठेवला. मुलींमध्ये महाराष्ट्राला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले. मुलांमध्ये आर्यन खरात-प्रणव साहू सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. निबोध पाटिल-रुपेश रौप्यपदकाचे मानकरी ठरले.
महाराष्ट्राचे तालिकेतील अव्वल स्थान कायम महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखत यजमान मध्य प्रदेशाचे कडवे आव्हान रोखून धरत पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखले. महाराष्ट्राची (१४ सुवर्ण, १७ रौप्य, १२ कांस्य) ४३ पदके झाली आहेत. मध्य प्रदेशाची (१४ सुवर्ण, ७ रौप्य, ४ कांस्य) अशी २५ पदके आहेत. गतविजेते हरियाणा (११, ६, ४) अशा २१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.