आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Play India Youth Games | Weightlifter Veenatai, Medalist With Asmita Vikram, Akanksha Vyavaya Gold In 45kg Category

खेलाे इंडिया यूथ गेम्स:वेटलिफ्टर वीणाताई, अस्मिता  विक्रमासह पदकाच्या मानकरी, आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात सुवर्ण

भाेपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा वेटलिफ्टर वीणाताई आहेर आणि अस्मिता ढाेेणेने साेमवारी पाचव्या सत्रातील खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमासह पदकाचा बहुमान पटकावला. वीणाताईने सुवर्ण आणि अस्मिताने राैप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला वेटलिफ्टिंगमध्ये साेनेरी यशाने सुरुवात करता आली. यापाठाेपाठ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे चॅम्पियन ठरली. नेमबाजीमध्ये सानियाने कांस्यपदक पटकावले. अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या नावे आता ८३ पदकांची नाेंद झाली. यामध्ये २८ सुवर्ण, ३० रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यापाठाेपाठ हरियाणा २३ सुवर्ण, १८ राैप्य, १५ कांस्य अशा ५६ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश २३, १३, २० अशा ५६ तिसऱ्या स्थानावर आहेत.

आकांक्षाचे साेनेरी यश : आकांक्षाने ४५ किलो गटात स्नॅचमध्ये ६७ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ७७ असे १४४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. तिला महाराष्ट्राच्याच अस्मिता ढोणेकडून आव्हान मिळाले. मात्र, अस्मिता स्नॅच प्रकारात (६१ किलो) मागे राहिली. मात्र, क्लीन अँड जर्कमध्ये अस्मिताने ८२ किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद केली. ती १४३ किलो वजन उचलून रौप्यपदकाची मानकरी ठरली.

नेमबाजी : सानियाला पदार्पणात पदक : सानिया सापलेने पदार्पणात पदकाची मानकरी हाेण्याचा पराक्रम गाजवला. तिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ‌

कबड्डीत पुन्हा संमिश्र यश : कबड्डीत दुसऱ्या दिवशीदेखील संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी हरियाणाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागणाऱ्या मुलींनी आज तेलंगणाचा ६४-१६ असा ४८ गुणांनी पराभव केला. मुलांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, राजस्थानविरुद्ध हे प्रयत्न २७-२८ असे एका गुणाने कमी पडले.

दुसऱ्या प्रयत्नात सुवर्ण वीणाताई आहेर हिने स्नॅचमध्ये ५७ आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ७२ असे एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळवला. दोन्ही प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. तिने स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्या वर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली.

टेनिस :मधुरिमा, निशीत, रियाची विजयी सलामी टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात केली. महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौघांनीही एकतर्फी विजयाची नोंद केली. मुलींच्या गटात पुण्याच्या अस्मी आडकरने बंगालच्या सोहिनी मोहंतीचा कडवा प्रतिकार १-६, ६-२, ६-१ असा मोडून काढला. मधुरिमा सावंतने दिल्लीच्या लक्ष्मी गौडा हिचा ६-१, ६-२, तर निशीत रहाणेने मेघालयाच्या ईशान रावतचा ६-१, ६-० ने पराभव केला. रियाने हरियाणाच्या सूर्यांशी तन्वरवर ६-१, ४-६, ६-१ ने मात केली..

बातम्या आणखी आहेत...