आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Players Protesting Against Police Brutality Against Blacks, Organizers Had To Hold Matches Of Five Major Tournaments Postponed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट्स:कृष्णवर्णीयांवरील पोलिसांच्या अत्याचाराचा विरोध करताहेत खेळाडू, आयोजकांना पाच मोठ्या स्पर्धांचे सामने करावे लागले स्थगित

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला टेनिस खेळताना पाहण्याऐवजी या महत्त्वाच्या मुद्यावर लक्ष द्यायला हवे - ओसाका
  • अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णभेदाविरुद्ध आंदोलनामध्ये पुन्हा एकदा खेळाडू उतरले रस्त्यावर

एनबीए, महिला एनबीए, मेजर लीग बेसबॉल आणि मेजर लीग सॉकरच्या खेळाडूंनी अमेरिकेतील वाढत्या वर्णभेद व पोलिसांच्या वर्तनाविरुद्ध साहसी पाऊल उचलले. खेळाडूंनी कृष्णवर्णीय नागरिकांवरील अत्याचारविरोधात खेळावर बहिष्कार घातला.

अत्याचार विरोधात खेळाडू देखील उतरले. फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या एनबीए मिलवॉकी बक्सचा खेळाडू ओरलँडो मॅजिक विरुद्ध प्लेऑफचा सामना खेळण्यास आला नाही. मिलवॉकीचा जॉर्ज हिल व त्याचा सहकारी स्टर्लिंग ब्राउनने म्हटले की, “आम्ही जेकब ब्लॅकसाठी न्याय मागतोय. अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार ठरवावे. पोलिसांच्या प्रत्युत्तरासाठी, क्रुरता व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुद्यावर सार्थक उपाय करणे अनिवार्य आहे.’ दत्यानंतर सामना स्थगित करावा लागला. एनबीएचे इतर २ प्लेऑफचे सामने स्थगित केले. गेल्या रविवारी विस्किन्सन राज्याच्या केनोशामध्ये पोलिसांनी कृष्णवर्णीय जेम्स ब्लॅकच्या पाठीवर ७ गोळ्या मारल्या.

वर्णभेद व पोलिसांच्या वर्तना विरुद्ध प्रदर्शनात एनबीए व महिला एनबीए सर्वात पुढे आहे. मे महिन्यात मिनिसोटामध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लायडची पोलिसांकडून हत्या झाल्यानंतर ब्लॅक लाइव्ह मॅटर मूव्हमेंटमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

एमएलएसचे ५ व एमएलबीचे ३ गेम स्थगित
मेजर लीग सॉकरचे (एमएलएस) ५ सामने स्थगित केले. एमएलएसने म्हटले की, “आम्ही अन्याय विरोधातील लढाईत आपले खेळाडू, आमचे शहर, आमचे चाहते कृष्णवर्णीय समाजासोबत एकजुटीने उभे आहोत. आपल्याला परिवर्तन घडवण्यासाठी आवाज उठवावा लागेल.’ दुसरीकडे, मेजर लीग बेसबॉलमध्ये ३ सामने देखील रद्द झाले.

मेरिनर्समध्ये ८ टक्के कृष्णवर्णीय खेळाडू सिएटल मेरिनर्सने म्हटले की, “आमचे लक्ष बेसबॉल पेक्षा महत्त्वाच्या मुद्यावर असायला हवे. आम्हाला खेळताना पाहण्यापेक्षा लोकांनी खेळापेक्षा अधिक महत्त्वाच्या मुद्यावर लक्ष द्यायला हवे.’ मेरिनर्स संघात एमएलबीच्या इतर कोणत्याही संघाच्या तुलनेत सर्वाधिक ८ खेळाडू आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या यादीत १० कृष्णवर्णीय खेळाडू होते.

कृष्णवर्णीयांवरील होणारा अन्याय थांबायलाच हवा : ओसाका
स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ओसाकाने म्हटले की, “खेळाडू होण्यापूर्वी मी एक कृष्णवर्णीय महिला आहे. मला माहिती आहे, मी टेनिस न खेळल्याने काही बदल होणार नाही. मात्र, एक खेळाडू असल्याने माझ्या वर्तनामुळे चर्चा सुरू झाली तर मी उचललेले पाऊल योग्य असल्याचे मानेल. मी या सर्व गोष्टींमुळे थकले. अखेर हे कधी थांबेल? कृष्णवर्णीयांविरोधातील अन्याय थांबायला हवा.’

एनबीए टीम वॉशिंग्टन मिस्टिक्सचे खेळाडू अटलांटा ड्रीम विरुद्ध जेकब ब्लॅकच्या नावाची जर्सी घालून आल्या होत्या. त्यांनी गोळ्यांचे छिद्रे दाखवण्यासाठी जर्सीच्या मागे छिद्रे केली होती. वेस्टर्न अँड सदर्न ओपन, एनबीए, महिला एनबीए, मेजर लीग बेसबॉल, सॉकरचे सामने स्थगित

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser