आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Playing In IPL Will Be A Matter Of Pride For Pakistani Cricketers , Says Shahid Afridi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर:आयपीएल क्रिकेट जगातील मोठा ब्रँड, यात न खेळून पाकिस्तानी खेळाडू मोठी संधी गमावत आहेत- शाहिद आफ्रिदी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये 11 पाकिस्तानी क्रिकेटर्स खेळले होते, नंतर त्यांच्यावर बंदी घातली

आयपीएल-13 यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरू आहे. शनिवारपर्यंत या सीजनचे आठ सामने झाले आहेत. 10 नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना असेल. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लँड, श्रीलंका न्यूजीलँड, वेस्ट इंडीज, साउथ अफ्रीकासह टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे खेळाडू सामील आहेत. आयपीएलच्या पहिल्या सीजन (2008)मध्ये 11 पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळले होते. पण, नंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. 2009 मध्ये श्रीलंकन टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि मुंबईत झालेल्या 26/11 च्या घटनेनंतर कोणत्याच पाकिस्तानी खेळाडूनला आयपीएलमध्ये खेळवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानी क्रिकेटपटू संधी गमावत आहेत

आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये खेळलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने अरब समाचारला दिलेल्या इंटरव्हूमध्ये म्हटले की, इंडियन प्रीमियर लीग वर्ल्ड क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड आहे. यात पाकिस्तानी क्रिकेटर न खेळून मोठी संधी गमावत आहेत. आयपीएलमध्ये खेळणे बाबर आजम आणि इतर पाकिस्तानी क्रिकेटर्ससाठी गौरवाची बाब असेल.

भारतात क्रिकेटचा आनंद घेतला

आफ्रिदी पुढे म्हणाला की, यात कोणतेच दुमत नाही की, मी भारतात क्रिकेटचा आनंद लुटला आहे. मला भारताच्या लोकांकडून नेहमीच प्रेम आणि सन्मान मिळाला. जेव्हा कदी मी सोशल मीडियावर बोलतो, तेव्हा मला भारतातील लोकांचा मेसेज येतो आणि मी त्यातल्या अनेकांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. भारतात मला खूप चांगला अनुभव मिळाला.

आयपीएलमध्ये आफ्रिदीचे करिअर

आयपीएलच्या पहिल्या सीजन 2008 मध्ये आफ्रिदीला डेक्कन चार्जर्सने आपल्या संघात सामील केले होते. आपल्या छोट्या आयपीएल करियरमध्ये त्याने 10 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...