आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि अंतिम कसोटीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता या सामन्याचा नाणेफेक झाला. यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे PM अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांची भेट घेतली आणि टीमसोबत मैदानावर राष्ट्रगीतही गायले.
व्ह्यूअरशिपचा सर्वात मोठा रेकॉर्ड बनू शकतो
अहमदाबादचे क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात जास्त प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेडियम आहे. यात १.३२ लाख प्रेक्षक बसू शकतात. या सामन्यादरम्यान एका दिवसात सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विश्वविक्रमही केला जाण्याची शक्यता आहे. सध्याचा विश्वविक्रम मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (ऑस्ट्रेलिया) च्या नावावर आहे. 2014 मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेदरम्यान एका दिवसात 91,112 प्रेक्षक होते.
पाहा मैदानातील फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.