आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • PM Narendra Modi Gifts Auction Update; Neeraj Chopra Javelin, PV Sindhu Racket, Lovlina Borgohain Boxing Gloves

मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव:पॅरालिम्पियन नोएडा DM च्या रॅकेटची बोली 10 कोटी, नीरज चोप्राच्या भाल्यासाठी 1.25 कोटींची बोली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांनी सुहासच्या रॅकेटमध्ये रस दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 71 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालय पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव (ई-लिलाव) करत आहे. ऑनलाईन लिलाव 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. या लिलावात सुमारे 1300 वस्तू असतील. यामध्ये पंतप्रधान मोदींना टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे. या भेटवस्तूंमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा भाला आणि पॅरालिम्पिक खेळांचे रौप्यपदक विजेता नोएडाचे डीएम सुहास एलवाय यतीराज यांच्या बॅडमिंटन रॅकेटचा समावेश आहे.

लोकांनी सुहासच्या रॅकेटमध्ये रस दाखवला
ई-लिलाव आजपासून सुरू झाला आहे आणि ताज्या अपडेटनुसार, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुहास एलवायच्या रॅकेटची बोली 10 कोटींवर गेली आहे आणि नीरज चोप्राच्या भाल्याचीही बोली 1 कोटी 20 लाखांपर्यंत गेली आहे. बॉक्सर लवलीना बोरगोहेनच्या ग्लोव्हजची बोली देखील 1 कोटी 80 लाखांच्या पार गेली आहे.

ई-ऑक्शनमध्ये कशाचा समावेश
नीरजच्या भाल्याबरोबरच पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या सुमित अंतिलच्या भाल्याची मूळ किंमतही सुमारे 1 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावामध्ये अवनी लेखाराने स्वाक्षरी केलेल्या टी-शर्टचाही समावेश आहे, जिने पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण आणि कांस्य जिंकले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाच्या स्टिकची मूळ किंमत 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कांस्यपदक विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेनेच्या बॉक्सिंग ग्लोव्हजची मूळ किंमत 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कृष्णा नगरने स्वाक्षरी केलेल्या रॅकेटची मूळ किंमत 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ई-लिलावामध्ये इतर खेळाडूंचे स्पोर्ट्स गियर आणि काही इक्विपमेंट्सचा समावेश आहे.

राम मंदिराच्या मॉडेलचा समावेश
या भेटवस्तूंमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या अयोध्या राम मंदिराच्या मॉडेलचाही समावेश आहे. राम मंदिर मॉडेलची मूळ किंमत 10 लाख रुपये आहे. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिलेल्या लाकडी प्रतिकृतीचाही यात समावेश आहे. त्याची मूळ किंमत 5 लाख रुपये आहे.

नमामी गंगे मिशनला रक्कम दान केली जाईल
ई-लिलावातून मिळणारी रक्कम नमामी गंगे मिशनला दिली जाईल. यापूर्वी 2019 मध्ये सप्टेंबरमध्येही, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने अनेक गोष्टींचा ऑनलाइन लिलाव केला होता आणि त्याची रक्कम नमामी गंगे मिशनलाही दान करण्यात आली होती. ज्या कोणालाही या ई-लिलावामध्ये सहभागी व्हायचे आहे ते pmmementos.gov.in ला भेट देऊन नोंदणी करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...