आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ल्ड नंबर-1 इगा स्वियातेकने फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले आहे. तिने शनिवारी खेळलेल्या गेलेल्या महिला सिंगल्सच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गाफचा 6-1, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. इगाचा हा सलगचा 35 वा विजय आहे. इगाने अंतिम सामन्यात पहिल्या सेटपासूनच आक्रमक खेळ करत कोकोला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.
दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचून विजेती बनली
इगा दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळत होती. यापूर्वी 2020 च्या हंगामात तिने अमेरिकेच्याच सोफिया केनिनचा 6-4, 6-1 ने पराभव करुन पहिली फ्रेंच ओपन जिंकली होती.
सेमीफायनलमध्ये दोन्ही खेळाडूंची शानदार कामगिरी
सेमीफायनलच्या सामन्यात स्वियातेकने 20 व्या क्रमांकावरील कसातकिनाचा 6-2, 6-1 ने पराभव केला. तर कोकोने मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना 1 तास 28 मिनिटांपर्यंत चालला होता.
कोको जिंकली असती तर विक्रम झाला असता
कोकोचा गतवर्षी फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलध्ये पराभव झाला होता. त्यानंतर यंदाही ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली. तिने हा सामना जिंकला असता तर फ्रेंच ओपन जिंकणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली असती. तत्पूर्वी, इगा स्वियातेक व कोकोने एकमेकांविरोधात 2 सामने खेळले होते. त्यात दोन्हीवेळा स्वियातेकचा विजय झाला होता. 2021 मध्ये रोममध्ये सामना झाला होता. तो सामना स्वियातेकने 7-6 (3), 6-3 ने जिंकला होता. त्यानंतर यंदा मियामी ओपनमध्येही इगाने कोकोचा 6-3, 6-1 ने पराभव केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.