आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Postponement Of Tokyo Olympics Due To Corona; Olympics Difficult If Drug Is Not Made!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिक:काेरोनामुळे टाेकियाे ऑलिम्पिकला स्थगिती; औषध तयार झाले नाही तर ऑलिम्पिक कठीण!

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • क्रीडाग्राममध्ये बेघरांच्या आश्रयाची मागणी

जोपर्यंत कोरोना व्हायरसवरील औषध तयार होत नाही तोपर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन कठीण असल्याची भीती जागतिक आरोग्यतज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे या स्पर्धेच्या अायाेजनाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली.

व्हायरसमुळे ऑलिम्पिकला एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. एडिनबर्ग विद्यापीठाचे ग्लोबल हेल्थचे अध्यक्ष व प्राध्यापक देवी श्रीधरने म्हटले की, प्रभावी औषध व स्वस्थ उपचार महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती  आणि आयोजकांची या आठवड्यात एक कार्यकारी मंडळाची बैठक बोलावली होती.

क्रीडाग्राममध्ये बेघरांच्या आश्रयाची मागणी

कोरोना व्हायरसमुळे बेघर झालेल्या लोकांच्या गटाने  आॅलिम्पिकच्या क्रीडाग्रामची मागणी केली आहे. ऑलिम्पिक आयोजकांना ऑनलाइन याचिकेत क्रीडाग्रामचा विशाल परिसराचा वापर करण्याची परवानगी मागितली आहे. यावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...