आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:प्रदीप स्पोर्ट््स संघ विजयी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप स्पोर्ट््स संघाने झालानी टुल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफीमध्ये एसजीएस संघावर ४ गड्यांनी मात केली. मधुश जाेशीने सामनावीर पुरस्कार पटकावला. प्रथम फलंदाजी करताना एसजीएस संघाचा डाव १८.५ षटकांत १२३ धावांवर ढेपाळला. यात सलामीवीर अभिजित भगतने १७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचत सर्वाधिक ३५ धावा ठोकल्या. धीरजने १८, सचिनने १७ व आकाशने १८ धावा जोडल्या. प्रदीपकडून मधुश जोशीने ४ फलंदाज तंबूत पाठवले. प्रत्युत्तरात प्रदिप स्पोर्ट््स संघाने १९.५ षटकांत ६ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले.

बातम्या आणखी आहेत...