आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Praggnanandhaa | Indian Grandmaster R Praggnanandhaa Vs Magnus Carlsen In Airthings Masters Chess

भारतीयाची कामगिरी:16 वर्षांच्या भारतीय ग्रँडमास्टरने डाव पलटवला, प्रागननंदाने जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा केला पराभव

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा 16 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रागननंदाने ऑनलाइन खेळलेल्या जलद बुद्धिबळ टूर्नामेंट एयरथिंग्स मास्टर्समध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. सोमवारी सकाळी खेळल्या गेलेल्या खेळात प्रागननंदाने काळ्या मोहऱ्यांसह खेळण्यास सुरुवात केली आणि कार्लसनचा 39 चालींमध्येच पराभव केला.

12 व्या क्रमांकावर पोहोचलेला तिसरा भारतीय

या विजयानंतर प्रागननंदा 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय ग्रँडमास्टरचे 8 पॉइंट्स झाले आहेत. यापूर्वी त्याने केवळ लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. याशिवाय त्याने दोन सामने ड्रॉ खेळले, तर 4 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. प्रागननंदाने अनीश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्ध सामने ड्रॉ ठेवले होते, तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टोफ डुडा आणि शखरियार मामेदयारोव्ह यांच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता.

इयान नेपोमनियाचची या टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थानावर
काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना हरलेला रशियाचा इयान नेपोमनियाचची 19 गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. खेळाडूला प्रत्येक विजयासाठी 3 गुण आणि ड्रॉसाठी 1 गुण मिळतात. पहिल्या स्टेपमध्ये अजून 7 फेऱ्या खेळणे बाकी आहे.

वयाच्या 12 व्या वर्षी मोडला होता विश्वनाथन आनंद यांचा विक्रम
2018 मध्ये जेव्हा प्रागननंदा 12 वर्षांचा होता, तेव्हा त्यांने भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचा विक्रम मोडला होता. त्यांनी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. विश्वनाथन यांनी वयाच्या 18 व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. याआधी 2016 मध्ये प्रागननंदाने यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा किताबही पटकावला आहे.

बातम्या आणखी आहेत...