आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) व भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) भारताच्या कनिष्ठ व वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादच्या प्राजक्ता लालसरे-होसूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता सध्या बंगळुरू येथे कर्नाटक स्टेट रायफल असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एनएआरआयचे सरचिटणीस सुलतान सिंग, सचिव राजीव भाटिया, सहसरचिटणीस पवन सिंग यांच्या निवड समितीने प्राजक्ताची निवड केली. नवी दिल्ली येथे १ ते १८ मेदरम्यान होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरापासून त्या संघासोबत सहभागी झाल्या. त्यांच्या निवडीबद्दल उद्योजक उल्हास लालसरे, डॉ. आशा लालसरे, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पी. व्ही. कुलकर्णी, अनंत बर्वे, मनीष धूत, पांडुरंग साळुंके, उमेश पटवर्धन, हेमंत मोरे आदींनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.