आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Prannoy Beat The Singaporean For The Third Time In The Quarterfinals Of The Japan Open

बॅडमिंटन:प्रणय जपान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत, सिंगापूरच्या खेळाडूला तिसऱ्यांदा हरवले

ओसाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणयने जपान ओपनमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. पुरुष एकेरीत प्रणयने आठव्या मानांकित सिंगापूरच्या लोह कीन येवचा २२-२०, २१-१९ अशा फरकाने पराभव केला. ४४ मिनिटे हा सामना रंगला. प्रणय आणि लोह कीन येव चौथ्यांदा आमने-सामने आले होते. प्रणयचा त्याच्याविरुद्ध हा तिसरा विजय. आता उपांत्यपू्र्व फेरीत त्याचा सामना सातव्या मानांकित तैवानच्या चाऊ टीएन चेनशी होणार आहे. दुसरीकडे किदांबी श्रीकांतला प्री-क्वार्टरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्याला जपानच्या कांटा सुनीयामाने २१-१०, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले. दोघे दुसऱ्यांद्या एकमेकांशी भिडले. दोन्ही वेळा सुनीयामाने विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...