आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहराष्ट्रामध्ये आता वेगाने जिम्नॅस्टिकचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी आम्ही राज्यातील लेव्हल थ्री कोचच्या माध्यमातून राज्यातील तळागाळात जिम्नॅस्टिकला चालना देणार आहाेत. यासाठी खास मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय गुणवंत युवा खेळाडूंना आगामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या तयारीसाठी बालेवाडीत खास प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती नवनियुक्त सचिव डाॅ. मकरंद जोशी यांनी दिली. त्यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्रामध्ये २२ आंतरराष्ट्रीय पंचही आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भांडारकरांचा पराभव; शेटे विजयी : उपायुक्त धर्मदाय मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेची निवडणूक घेण्यात आली. मुंबईमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबई शहरचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी, तर सचिवपदासाठी डॉ. मकरंद जोशी यांनी विजय मिळवला. शेटे यांनी मुंबई उपनगरचे वीरेंद्र भांडारकर यांचा २४-२२ आणि डॉ. जोशी यांनी नाशिकच्या राकेश केदारे यांचा २५-२१ मतांनी पराभव केला.
कार्यकारिणी : अध्यक्ष : संजय शेटे (मुंबई शहर) सचिव : डॉ. मकरंद जोशी (जालना) कार्याध्यक्ष : के. जाधव (कोल्हापूर) कोषाध्यक्ष : आशिष सावंत (वैयक्तिक सभासद) उपाध्यक्ष : सुनील चौधरी (धुळे), संदीप जोशी (पुणे), मंगेश इंगळे (वैयक्तिक सभासद), माधुरी चेंडके (अमरावती), डॉ. आदित्य जोशी (औरंगाबाद), बाळू ढवळे (ठाणे). सहसचिव : दीपक बराड (नागपूर), सविता मराठे (पुणे), संजय तोरस्कर (कोल्हापूर), विजय पहूरकर (बुलडाणा), मंदार म्हात्रे (मुंबई ). सभासद : संतोष जोशी (धुळे), गणेश ठाकरे (जालना), सुरेश भगत (वैयक्तिक सभासद), मुकेश कदम (रत्नागिरी), अजय मापुस्कर (वैयक्तिक सभासद), संतोष पिंगळे (बुलडाणा).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.