आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) फ्रेंच सुपर कपवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. फ्रान्सच्या या फ्रान्सच्या फुटबाॅल क्लबने फायनलमध्ये नांतेसचा पराभव केला. पीएसजीने ४-० ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. मेसी (२२ वा मि.), नेमार (४५+२, ८२ वा मि.) आणि सर्जियाे रामाेसने (५७ वा मि.) सर्वाेत्तम कामगिरीतून पीएसजीचे विजेतेपद निश्चित केले. यासह पीएसजीला दहा वर्षांत नवव्यांदा चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवता आला. सर्वात यशस्वी संघ म्हणून पीएसजीची ओळख आहे. या क्लबने १६ व्यांदा फायनल गाठली हाेती. पीएसजीने ११ वेळा जेतेपद व ५ वेळा उपविजेतेपद पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.