आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pune's Devika Returns To Indian Cricket Team After Four Years T20 Against Australia; Women's Team Announced

पुण्याच्या देविकाचे चार वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन:ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20; महिला संघ जाहीर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ९ डिसेंबरपासून मुंबईमध्ये यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील टी-२० मालिकेला सुरुवात हाेत आहे. याच मालिकेसाठी यजमान भारतीय महिला संघाची घाेषणा करण्यात आली. पुण्याची अष्टपैलू खेळाडू देविका वैद्यला दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघामधील प्रवेश निश्चित करता आला. यातून महाराष्ट्राची ही डावखुरी ऑलराउंडर चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तिने आपला शेवटचा सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला हाेता. तिने २०१४ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण केेले हाेते. हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ घरच्या मैदानावर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाची उपकर्णधारपदी निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...