आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Pune's Tallest Olympic Building In The Country; Forget The Mini Olympics!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट्स:पुण्यात देशातील सर्वात माेठे अाॅलिम्पिक भवन; मिनी अाॅलिम्पिकचा विसर!

अाैरंगाबाद ( एकनाथ पाठक )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासनाकडून २ काेटींचा निधी मंजूर; बालेवाडीत अडीच एकरांवर साकारणार भव्य इमारत
  • २० काेटींचे भवन; जिम, संघटनांची कार्यालये, ग्रंथालय एकाच जागेत

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देशातील पहिले अाॅलिम्पिक भवन साकारले जात अाहे. २० काेटींच्या या भव्य इमारतीसाठी शासनाच्या वतीने बालेवाडीमध्ये अडीच एकर जागाही मंजूर केली अाहे. याशिवाय शासनाच्या वतीने दाेन काेटींचा निधीही उपलब्ध करून देण्यात अाला. त्यामुळे अाता दाेन वर्षांत या ठिकाणी ही इमारत उभी राहण्याचे चित्र अाहे. राज्यातील सर्व संघटनांच्या मुख्य कार्यालयांसह जिम, क्रीडा विश्वातील पुस्तकांच्या ग्रंथालयासारखे सर्व एकाच ठिकाणी असणारे हे देशातील पहिलेच अाॅलिम्पिक भवन ठरणार अाहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात जागतिक स्पर्धेच्या धर्तीवरील मिनी अाॅलिम्पिक स्पर्धा अायाेजनाकडे राज्य अाॅलिम्पिक संघटनेकडून अद्यापही दुर्लक्ष झालेले अाहे. या स्पर्धेच्या अायाेजनाबाबत काेणत्याही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना दर्जाच्या स्पर्धेतील सहभागाला मुकावे लागत अाहे. मात्र, अाम्ही यासाठी प्रयत्नशील असल्याचे सचिव लांडगे यांनी सांगितले.

साध्या पद्धतीने सेलिब्रेशन
अाॅलिम्पिक दिन हा भारतीय अाॅलिम्पिक संघटना (अायअाेए) साध्या पद्धतीने साजरा करणार अाहे. यासाठी पदाधिकाऱ्यांशी व्हिडिअाे काॅन्फरन्सवरून संवाद साधला जाईल, अशी माहिती महासचिव राजीव मेहता यांनी “दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. सध्या लाॅकडाऊनमुळे अाम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
अडीच एकर जागेत भवन दाेन वर्षांत हाेणार तयार!पुण्यातील बालेवाडीमध्ये महाराष्ट्र अाॅलिम्पिक भवन तयार हाेणार अाहे. यासाठी शासनाकडूनच बालेवाडीमध्ये अडीच एकर जागा उपलब्ध करून देण्यात अाली. त्यामुळे अाता अागामी दाेन वर्षांत या ठिकाणी भव्य स्वरूपातील इमारतीमध्ये अाॅलिम्पिक भवन साकारला जाणार अाहे. यासाठी २० काेटींचे अंदाजे अार्थिक बजेट अाहे. सध्या शासनाकडून याला दाेन काेटींची मंजुरी मिळाली अाहे. हे देशातील पहिलेच भव्य स्वरूपातील अाणि अत्याधुुनिक साेयी-सुविधांनी परिपूर्ण असे भवन असेल. एकाच भवनात राज्यातील सर्व संघटनांची मुख्य कार्यालये, जिम, क्रीडा विश्वातील पुस्तकांचे अद्ययावत ग्रंथालय असेल, अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र अाॅलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

मिनी अाॅलिम्पिक स्पर्धा अायाेजन हाेईनामहाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना मिळावी, याच हेतूने जागतिक स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात मिनी अाॅलिम्पिक अायाेजनाचा निर्णय झाला. मात्र, मागील दहा वर्षांपासून राज्यात मैदानावर प्रत्यक्षात ही स्पर्धा अायाेजित करण्याचा निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मिनी अाॅलिम्पिक स्पर्धेचे अायाेजन करण्यासाठी अाॅलिम्पिक संघटनाही निरुत्साही अाहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील खेळाडू या दर्जेदार स्पर्धेअभावी अापल्या कामगिरीला सिद्ध करू शकत नाहीत. ही स्पर्धा अायाेजित केल्यास खेळाडूंना फायदा हाेईल, असे क्रीडातज्ञाचे मत अाहे. तसेच हे दुर्लक्षित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...