आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:पंजाब संघाची 5 धावांनी यजमान राजस्थान राॅयल्सवर मात, पंजाबचा दुसरा विजय

गुवाहाटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभसिमरन, शिखर धवनची झंझावाती खेळी; नॅथन इलिसचे 4 बळी; पंजाबचा दुसरा विजय

सलामीवीर प्रभसिमरन (६०), कर्णधार शिखर धवन (नाबाद ८६) आणि नॅथन इलिसने (४/३०) पंजाब किंग्ज संघाचा आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने बुधवारी गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर यजमान राजस्थान राॅयल्स टीमचा पराभव केला. पंजाब संघाने ५ धावांनी सामना जिंकला. यासह पंजाब संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. राजस्थानला लीगमध्ये पहिल्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यामध्ये राजस्थानसमाेर विजयासाठी १९८ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावत १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थान संघाकडून घरच्या मैदानावर कर्णधार संजू सॅमसन (४२), हेटमेयर (३६) व ध्रुवने (नाबाद ३२) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली.

प्रभसिमरनचे २८ चेंडूंत पहिले अर्धशतक साजरे
पंजाब संघाच्या सलामीवीर प्रभसिमरन आणि कर्णधार शिखर धवनने गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर आयाेजित आयपीएलचा पहिलाच सामना आपल्या झंझावाती खेळीने गाजवला. या दाेघांनी तुफानी खेळीतून यंदाच्या आयपीएलमध्ये अर्धशतकाचे खाते उघडले. प्रभसिमरनने २८ चेंडूंमध्ये ७ चाैकार व २ षटकारांतून अर्धशतक साजरे केले. त्याने सामन्यात ३४ चेंडूंत ६० धावा काढल्या. तसेच शिखर धवनने ३६ चेंडूंत यंदाचे अर्धशतक साजरे केले. त्याने ५६ चेंडूंमध्ये ९ चाैकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावा काढल्या.