आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • PV Sindhu Vs BingJiao LIVE Bronze Medal Match; Tokyo Olympics Badminton LIVE; Sindhu Vs BingJiao Live, LIVE Updates

सिंधूने रचला इतिहास:सलग 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू, सुशील कुमारच्या विक्रमाची केली बरोबरी

टोकियो2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ओव्हरऑल ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये भारताला तिसरे पदक

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. एकंदरीत, ती सुशील कुमार नंतर भारताची दुसरी खेळाडू आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या जियाओ बिंग हिचा 21-13, 21-15 असा पराभव केला. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. सुशीलने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

ओव्हरऑल ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये भारताला तिसरे पदक
सायना नेहवाल
ब्रॉन्ज मेडल: लंडन ऑलिम्पिक (2012)

पीव्ही सिंधु
सिल्वर मेडल: रियो ऑलिम्पिक (2016)

पीवी सिंधु
ब्रॉन्ज मेडल: टोकियो ऑलिम्पिक (2020)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडे आतापर्यंत 3 पदके आहेत
टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. सर्वप्रथम मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. त्याचबरोबर, बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन 69 किलो वेल्टरवेट कॅटेगिरीत उपांत्य फेरी गाठून भारतासाठी पदक पक्के केले आहेत.

सिंधू-जियाओ यांच्यात आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत
सिंधू आणि जियाओ यांच्यात आतापर्यंत एकूण 16 सामने झाले आहेत. यापैकी जिओने 9 सामने आणि सिंधूने 7 सामने जिंकले आहेत. सिंधूने गेल्या दोन सामन्यांमध्ये जिओचा पराभव केला आहे. या सामन्यापूर्वी सिंधूने चीनच्या खेळाडूचा 21-19, 21-19 असा पराभव केला होता.

सिंधू उपांत्य सामन्यात पराभूत झाली
सिंधूला उपांत्य फेरीत वर्ल्ड नंबर-1 चीनी तायपेच्या ताइजु यिंगकडून 21-18, 21-13 असा पराभव पत्करावा लागला होता. हा सामना गमावल्यानंतर ती गोल्ड आणि सिल्वर शर्यतीतून बाहेर पडली. सिंधीला चीनी तायपेच्या खेळाडूने लांब रॅली, माईंड गेम आणि नेट प्लेमध्ये हरवले होते.

पीव्ही सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकचा प्रवास

 • पहिल्या सामन्यात इस्रायलच्या सेनिया पोलिकरपोवाचा 21-7, 21-10 असा पराभव केला.
 • दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगच्या गन यी चियुंगला 21-9, 21-16 ने हरवले.
 • उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा 21-15, 21-13 असा पराभव केला.
 • उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा 21-13, 22-20 असा पराभव केला.
 • उपांत्य फेरीत चायनीज ताइपेच्या ताइजु यिंगने सिंधूचा 21-18, 21-12 असा पराभव केला.
 • तिने कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या जियाओ बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला.
बातम्या आणखी आहेत...