आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Marathi News | Qatar Spends Rs 22 Lakh Crore On FIFA World Cup Preparations

नवे वर्ष, नवी आशा:कतारचा फिफा वर्ल्डकप आयोजन तयारीवर 22 लाख कोटींचा खर्च; रक्कम 165 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक

नवी दिल्ली / ऋषिकेशकुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदाच्या सत्रातील सर्वात मोठा स्पोर्टिंग इव्हेंट २१ नोव्हेंबरपासून कतारमध्ये

फिफाची वि‌श्वचषक फुटबॉल स्पर्धा ही यंदाच्या हंगामातील सर्वात मंठा स्पोर्ट्स इव्हेंट मानला जातो. या बिग इव्हेंटच्या तयारीसाठी यजमान कतार देशानेही बिग इन्व्हेस्टमेंट केली आहे. कतारने आतापर्यंत २१ नाेव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान आयाेजित हाेणाऱ्या फिफाच्या विश्वचषकात आयाेजनाच्या तयारीवर २२ लाख काेटींचा खर्च केला आहे. ही रक्कम १६५ देशांच्या विकास दरापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. तसेच फुटबाॅलच्या सर्वाेच्च संस्था फिफाने पहिल्यांदाच या बिग इव्हंंेटचे यजमानमध्ये मिडल ईस्टमधील देशाला दिले आहे. कतार हा फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणारा सर्वात लहान देश ठरला आहे. कतारचे क्षेत्रफळ ११,५७१ वर्ग किमी आहे. याच क्षेत्रफळावर असलेल्या कतारमधील पाच माेठ्या शहरात आठ आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबाॅल मैदाने आहेत. या मैदानांवर ३२ संघ हे स्पर्धेतील ६४ सामने खेळणार आहे.

राेनाल्डाेचा स्पर्धेत सहभाग; मार्चमध्ये हाेणार निश्चित
युराे २०२० चॅम्पियन इटली आणि युराे २०६ चॅम्पियन पाेर्तुगाल या दाेन्हीपैकी एकाच टीमला कतारमधील विश्वचषकात आपले नशीब आजमावता येणार आहे. कारण हे दाेन्ही संघ आता एकाच प्लेआॅफमध्ये आहे. प्लेआॅफ सामने मार्च महिन्यात हाेणार आहेत. म्हणजेच राेनाल्डाेचा या स्पर्धेतील सहभाग हा मार्च महिन्यात निश्चित हाेणार आहे.

कतारमध्ये इव्हेंटचे आयाेजन; इन्फ्रास्ट्रक्चरवर सर्वाधिक खर्च
कतारमध्ये माेठ्या इव्हेंटचे आयाेजन केले जात आहे. याशिवाय कतारला क्रीडाविश्वातील सर्वात माेठ्या स्पाेर्ट््स इव्हंेटचे आयाेजन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कतार भव्य स्वरूपात या स्पधेच्या आयाेजनावरील सढळ हाताने खर्च करत आहे. यातून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चवर सर्वाधिक ख‌र्च करण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार झाले.

भारताला दुसऱ्यांदा फिफाचे यजमानपद; आॅक्टाेबरमध्ये युवांची विश्वचषक स्पर्धा
भारताला आता दुसऱ्यांदा फिफाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. भारतात या हंगामात ११ ते ३० आॅक्टाेबरदरम्यान महिलांच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. ही स्पर्धा २०२० मध्येच भारतात हाेणार हाेती. मात्र, काेराेना महामारीमुळे स्थगित करण्यात आली. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये पुरुषांच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेेचे यशस्वीपणे आयाेजन केले हाेते. त्यानंतर आता भारताला पुन्हा यजमानपद मिळाले आहे.

कतारमध्ये मजुरांचे शाेषण; ६ हजार मजुरांचा आतापर्यंत मृत्यू
विश्वचषकाची मैदाने तयार करण्यासाठी सध्या कतारमध्ये जगभरातील कामगार, मजूर आले आहेत. मात्र, यादरम्यान या सर्वांचे प्रचंड शाेषण केले जात आहे. यातून आतापर्यंत ६५०० मजुरांचा तडफडून मृत्यू झाला. हे इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांनी समाेर आणले. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील मजूर काम करत आहेत.

विक्रमी ५५० काेटींच्या व्ह्यूअरशिपची आशा
रशियातील गतवेळच्या विश्वचषक स्पर्धेला ३५७ काेटी चाहत्यांची पसंती मिळाली हाेती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत ही संख्या वेगाने वाढणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. यातूनच कतारमधील विश्वचषक ५५० काेटी फुटबाॅलप्रेमी पाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातून या विश्वचषकाला वर्ल्ड रेकाॅर्ड करण्याची संधी आहे. २०२० मध्ये व्ह्यूअरशिप ५२३ काेटी हाेती.

बातम्या आणखी आहेत...