आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Radukanu Became The Champion Without Losing The Set; News And Live Updates

यूएस ओपन:सेट न गमावता राडुकानू बनली चॅम्पियन; एमा राडुकानूने अंतिम लढतीत एनी फर्नांडेझला 6-4, 6-3 ने हरवले

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वीलेखक: क्रिस्टोफर क्लेरी
  • कॉपी लिंक
  • राडुकानूच्या वैद्यकीय विश्रांतीदरम्यान फर्नांडेझची अधिकाऱ्यासमोर नाराजी

दोन आठवड्यांपूर्वी मोजक्याच लोकांना एमा राडुकानू किंवा लेलाह एनी फर्नांडेझ यांचे नाव माहिती होते. १९ वर्षीय फर्नांडेझ कधीही महत्त्वाच्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती. गेल्या काही दिवसांत तिने लय गमावली होती. १८ वर्षीय राडुकानू याच वर्षी स्पर्धेत सहभागी झाली. ती पात्रता सामने खेळाडू यूएस ओपनच्या मुख्य फेरीत पोहोचली. शनिवारी रात्री झालेल्या वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम लढतीत या दोन्ही समोरासमोर आल्या. इंग्लंडच्या राडुकानूने कॅनडाच्या फर्नांडेझला ६-४, ६-३ ने पराभूत करत इतिहासात आपले नाव कोरले. तिने एकही सेट न गमावता स्पर्धा जिंकली.

सेरेना अखेरच्या वेळी एकही सेट न गमावता यूएस ओपन जिंकली होती. दोघींनी शांतपणे सामन्यापूर्वी मुलाखत दिली. ती आपल्या करिअरच्या सर्वात मोठ्या सामन्यासाठी कोर्टवर पोहोचली, जेथील भिंतीवर लिहिले होते की, दबाव एक विशेषाधिकार आहे. फर्नांडेझने बँकहँड क्रॉसकोर्टद्वारे सामन्यातील पहिला गुण मिळवला. मात्र, त्यानंतर राडुकानूने पुनरागमन करत पहिला गेम जिंकला. डावखुरी फर्नांडेझ अधिक स्पिनचा उपयोग करत होती. दुसरीकडे, उजव्या हाताची राडुकानू ताकदीने शॉट मारण्यावर विश्वास ठेवला.

राडुकानूच्या वैद्यकीय विश्रांतीदरम्यान फर्नांडेझची अधिकाऱ्यासमोर नाराजी
फायनलच्या दुसऱ्या सेटदरम्यान राडुकानू ५-३ ने पुढे होती आणि सर्व्हिसदेखील तिच्याकडे होती. मात्र, फर्नांडेझने ३०-४० ची आघाडी घेतली होती व तिची सर्व्हिस मोडायची संधी होती. तेव्हा राडुकानूच्या गुडघ्यातून रक्त येऊ लागल्याने तिला वैद्यकीय विश्रांती घ्यावी लागली. टाइम-आऊट मिळाल्यानंतर फर्नांडेझने सामना अधिकाऱ्यासमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर राडुकानूने गेम, सामना व यूएस ओपनची ट्रॉफी जिंकली.

बातम्या आणखी आहेत...