आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी ओपन टेनिस:राफेल नदालचा फ्रान्सच्या गास्केटवर सलग 18 वा विजय

न्यूयॉर्क25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रँडस्लम स्पर्धांचे २२ विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालने अमेरिकी ओपन टेनिस स्पर्धेच्या प्रि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिसऱ्या फेरीत स्पेनच्य नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटला सरळ तीन सेट्समध्ये ६-०, ६-१, ७-५ ने पराभूत केले. दोघा खेळाडू आतापर्यंत १८ वेळा एकमेकांविरोधात खेळले त्यात नदालने सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. प्री क्वार्टर फायनलमध्ये नदालची लढत अमेरिकेच्या फ्रान्सिस तियाफोशी होणार आहे. टॉप सीडेड डॅनियल मेदवेदेवने चीनच्या बिगर मानांकित यिंबिंग वूला सलग सेटस मध्ये ६-४,६-२,६-२ ने हरवले. प्री क्वार्टरमध्ये मेदवेदेवचा सामान ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोसशी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...