आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदालची झुंज ठरली व्यर्थ:राफेल नदालचा सलग दुसरा पराभव; अ‍ॅलेक्स मिनाैर विजयी

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात दमदार पुनरागमन करण्याचा माजी नंबर वन टेनिसपटू राफेल नदालचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे. यातूनच ताे नव्या वर्षाच्या सुुरुवातीला दाेन सामन्यांत पराभूत झाला. त्याला युनायटेड कप टेनिस स्पर्धेत आपल्या स्पेन संघाकडून खेळताना पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या मिनाैरने घरच्या मैदानावर सरस खेळी करताना एकेरीच्या लढतीत नदालचा पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूने ३-६, ६-१, ७-५ ने सामना जिंकला. याच खेळीच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने सांघिक गटाच्या सामन्यात स्पेनला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने ३-२ ने सामना जिंकला. येत्या १६ जानेवारीपासून सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. या युनायटेड कप स्पर्धेला आगामी ग्रँडस्लॅमच्या तयारीसाठी महत्वाचे मानले जाते. मात्र, नदालचा दाेन वेळा पराभव झाला. स्पेनच्या डियाजने महिला एकेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या मॅडिसनचा ६-१, ६-३ ने पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...