आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rahi's Fifth Medal In The World Cup; Chinki, Rahi, Manu Won 25m. Gold Medal In Pistol

विश्वकप नेमबाजी:राहीचे विश्वचषकात पाचवे पदक;  चिंकी, राही, मनूने जिंकले 25 मी. पिस्तूलमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादामुळे हंगेरी संघ स्पर्धेबाहेर; अाता फायनल भारत-अमेरिका संघात हाेणार

कोल्हापूरच्या ऑलिम्पियन नेमबाज राही सरनाेबतने एका दिवसाच्या अंतरात अायएसएसएफच्या विश्वचषकामध्ये सलग दुसऱ्या पदकाचा वेध घेतला. वर्ल्डकपमधील विक्रमी पदकविजेत्या या नेमबाजाने गुरुवारी अापल्या सहकारी चिंकी यादव व मनू भाकरसाेबत महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या तिघींनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक गटात चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. महाराष्ट्राच्या राही सरनाेबतने स्पर्धेत दुसरे पदक अापल्या नावे केले. तिने बुधवारी वैयक्तिक गटात राैप्यपदक जिंकले हाेते. तसेच तिचे करिअरमधील विश्वचषकातील हे पाचवे पदक ठरले. तिने यापुर्वी २०११ मध्ये कांस्य, २०१३ मध्ये सुवर्ण, २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकले हाेते.

अाता तिच्या नावे २०२१ च्या विश्वचषकात प्रत्येकी एका सुवर्ण व राैप्यपदकाची नाेंद झाली अाहे. यजमान भारतीय संघाने गुरुवारी दहाव्या सुवर्णपदकाची भर अापल्या खात्यात घातली अाहे. भारताच्या नावे १० सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांची नाेंद झाली. यासह यजमान भारताला पदक तालिकेतील अापले अव्वल स्थान अधिक मजबूत करता अाले. तसेच राहीने पदकाची लय कायम ठेवताना पाेलंडविरुद्ध विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळेच तिच्यासह चिंकी यादव अाणि मनू भाकरने १७-७ ने पाेलंड टीमवर मात करून सुवर्णपदक अापल्या नावे केले.

तसेच महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझिशनच्या सांघिक गटात भारतीय संंघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला. या गटात अंजुम मुदगिल, श्रेया सक्सेना आणि गायत्री नित्यानंदमने दुसरे स्थान पटकावले. भारतीय रायफल संघाला फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताच्या महिला संघाने अवघ्या पाच गुणांनी सुवर्णपदकाचा बहुमान गमावला. यादरम्यान पोलंड संघाने ४७-४३ विजयाची नाेंद केली. यात इंडोनेशियाने कांस्यपदक जिंकले.

वादामुळे हंगेरी संघ स्पर्धेबाहेर; अाता फायनल भारत-अमेरिका संघात हाेणार : ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारत व हंगेरी यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान हंगेरीच्या खेळाडूंमध्ये आपापसात वाद सुरू झाला. त्यामुळे हा सामना स्थगित झाला. त्यानंतर पंचांनी हंगेरी संघाला बाद केले. आता या गटाची फायनल भारत व तिसऱ्या स्थानावरील अमेरिका संघात होईल.

बातम्या आणखी आहेत...