आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rahit Sharma To Play Semi final Match Against Jaibandi England During Warm up India Vs England Semi final Match

राेहित शर्मा सरावादरम्यान जायबंदी:इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना खेळणार, भारत - इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना

अॅडिलेड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया टी-२० विश्वचषकाची फायनल गाठण्याच्या इराद्याने उद्या गुुरुवारी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना हाेणार आहे. मात्र, या उपांत्य सामन्यापूर्वीच भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. कारण, सध्या टीमचा कर्णधार राेहित शर्मा जायबंदी झाला आहे. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सरावादरम्यान थ्राे डाऊन स्पेशलिस्ट रघू राघवेंद्रचा चेंडू राेहितच्या मनगटावर लागला. त्यामुळे बॅट तशीच टाकून ताे बाहेर पडला. यादरम्यान फलंदाजी काेच विक्रम राठाैर आणि गाेलंदाजी काेच पारस म्हाम्ब्रे यांनी लगेच राेहितची चाैकशी केली. त्यांनी तात्काळ फिजिओ कमलेश जैन आणि वैद्यकीय पथकाकडून राेहितची तपासणी करून घेतली. यादरम्यान ४० मिनिटे राेहितला विश्रांती घ्यावी लागली. ही दुखापत फार गंभीर नाही. मात्र, त्याला विश्रांती देण्यात आली. मात्र, त्यानंतर त्याने सरावाला सुरुवात केली. यामुळे त्याचा इंग्लंड संघाविरुद्ध उपांत्य सामन्यातील सहभाग निश्चित मानला जात आहे. त्याला आता दर्जेदार खेळी करावी लागणार आहे.

कार्तिकला पुनरागमनाची संधी आगामी इंग्लंड संघाविरुद्ध उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियाने कसून सराव केला. यादरम्यान कर्णधार राेहित शर्मासह हार्दिक, दिनेश कार्तिक हे नेट प्रॅक्टिसच्या वेळी उपस्थित हाेते. त्यामुळे ऋषभला विश्रांती देत या उपांत्य सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकला संधी दिली जाण्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...