आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वचषक कुस्ती स्पर्धा:राहुल आवारे 12 डिसेंबरपासून सर्बियाच्या आखाड्यात!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता मल्ल राहुल आवारे आता सर्बियाच्या आखाड्यात पदकाचा बहुमान पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. ताे येत्या १२ डिसेंबरपासून सर्बियात हाेणाऱ्या इंडिव्हिज्युअल विश्वचषक कुस्ती स्पर्धेत सहभागी हाेणार आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन राहुल हा ६१ किलाे वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत भारताचा २४ सदस्यीय संघ सहभागी हाेणार आहे. सर्बियाच्या बेलग्रेड येथे विश्वचषक १२ ते १८ डिसेंबर राेजी आयाेजित करण्यात आला. या स्पर्धेत भारताचे २४ मल्ल आपले काैशल्य पणास लावणार आहेत. यामध्ये आठ महिला कुस्तीपटूंचा समावेश आहे. या संघात आॅलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक सहभागी हाेईल. काेराेनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच जागतिक दर्जाची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची विशेष तयारी संघाला करता आली. यातून भारताचा पदकाचा दावाही मजबूत झाला आहे.

स्पर्धेच्या टूरसाठी ९० लाख मंजूर :
केंद्र सरकारच्या वतीने सर्बियातील विश्वचषक स्पर्धेत सहभागी भारतीय संघासाठी ९० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये संघाच्या एअर तिकीट, बाेर्डिंग, लाॅजिंग, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा लायन्स िव्हसा आणि खेळाडू, पंच, काेचच्या खर्चाचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी २४ सदस्यीय टीमसाेबत नऊ प्रशिक्षक, तीन सपाेर्ट स्टाफ आणि तीन पंच सर्बियाला जाणार आहेत. त्यासाठी हा अंदाजे खर्च लागणार आहे.

स्पर्धेत सहभागी हाेणारे संघ
फ्रीस्टाइल
: रवी कुमार (५७ कि.), राहुल आवारे (६१ कि.), नवीन (७० कि.), गौरव बलियान (७९ कि.), दीपक पुनिया (८६ कि.), सत्यव्रत कादियान (९७ कि.), सुमित कुमार (१२५ कि.)

ग्रीको-रोमन : अर्जुन हलाकुर्की (५५ कि. ), ज्ञानेंद्र (६० कि.), सचिन राणा (६३ कि.), आशु (६७ कि.), आदित्य कुंडू (७२ कि.), साजन (७७ कि.), सुनील कुमार (८७ कि.) , हरदीप (९७ कि.), नवीन (१३० कि. ).

महिला गट: निर्मला देवी (५० कि.), पिंकी (५५ कि.), अंशु (५७ कि.), सरिता (५९ कि. ), सोनम (६२ कि.), साक्षी मलिक (६५ कि.), गुरशरण प्रीत कौर (७२ कि.) , किरण ( ७६ कि.).

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser