आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rahul Dravid । Team India Cricket Coach Rahul Dravid । BCCI Had Sent A Proposal To Ricky Ponting Before Dravid; After Being Rejected, Dravid Will Now Take The Place Of Ravi Shastri

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचे नवीन कोच:BCCI ने पाठवला होता द्रविड आधी रिकी पॉन्टिंगला प्रस्ताव; नकार दिल्यानंतर आता द्रविड घेणार रवि शास्त्रींची जागा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र त्याने तो प्रस्ताव फेटाळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने रवि शास्त्री यांच्या जागी रिकी पॉन्टिंगला टीम इंडियाचे कोच बनण्याची संधी दिली होती. मात्र पॉन्टिंगने टीम इंडियाचा कोच बनण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. सध्या पॉन्टिंग हा दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल टीममध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.

द्रविड घेणार शास्त्रीची जागा

दुबईमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह या दोघांनीही राहुल द्रविड सोबत चर्चा केली आहे. त्यात टी-20 वर्ल्डकप नंतर त्यांना टीम इंडियाची धुरा सांभाळण्याचे सांगण्यात आले आहे. द्रविड 2023 पर्यंत वनडे वर्ल्डकप पर्यंत टीम इंडियासोबत असणार आहे. सोबतच गोलंदाजीच्या प्रशिक्षणासाठी पारस म्हाम्ब्रे याला देखील टीम इंडियात सहभागी करण्यात आले आहे. त्याचे देखील कार्यकाळ 2023 वर्ल्डकपपर्यंत असणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकी पॉन्टिंगने नकार दिल्यानंतर द्रविडला सोडून बीसीसीआयकडे कोणत्याही पर्याय नव्हता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

द्रविड लवकरच देणार NCA ला राजीनामा

राहुल द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॉडमीचे अध्यक्ष आहे. शुक्रवार आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे की, राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षणार्थी होणार आहे. त्यामुळे ते लवकरच NCA ला आपला राजीनामा देणार आहे.

रिकी पॉन्टिंगच्या आधी बीसीसीआयने श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने याला देखील भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षणार्थी म्हणून ऑफर दिली होती. मात्र त्याने देखील स्पष्टपणे नकार दिला. पॉन्टिंग प्रमाणे जयवर्धने देखील IPL मधील मुंबई इंडियन्स संघाला प्रशिक्षण देत आहे. या दोन्ही खेळाडूंची आयपीएलमध्ये मोलाची कामगिरी आहे.

बातम्या आणखी आहेत...