आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rahul Successful In Batting; India Zimbabwe ODI Series Starting Tomorrow, Striving For Victory In Leadership

क्रिकेट:राहुल फलंदाजीमध्ये यशस्वी; नेतृत्वात विजयासाठी प्रयत्नशील, भारत-झिम्बाव्वे संघांत उद्यापासून वनडे मालिका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि यजमान झिम्बाव्वे यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात हाेत आहे. हरारेच्या मैदानावर गुरुवारी हे दाेन्ही संघ सलामीच्या वनडे सामन्यात समाेरासमाेर असतील. दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेल्या लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेमध्ये खेळणार आहे. फलंदाजीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या राहुलचा आता नेतृत्वात कस लागणार आहे. त्यामुळे आपल्या कुशल नेतृत्वात टीम इंडियाचा मालिका विजय निश्चित करण्यावर त्याची नजर आहे. त्याची आतापर्यंत झिम्बाव्वे संघाविरुद्धची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मात्र, त्याला आता नेतृत्वातच स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. लाेकेश राहुलने आतापर्यंत ४२ वननडेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ४६.६८ च्या सरासरीने १,६३४ धावा काढल्या. यामध्ये पाच शतकांसह १० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २०१६ मध्ये वनडेमध्ये झिम्बाव्वेविरुद्ध सामन्यातून पदार्पण केले. त्याच्या नावे पदार्पणातच नाबाद १०० धावांच्या खेळीची नाेंद आहे. पदार्पणात वनडेत शतकी खेळी करणारा ताे पहिला भारतीय ठरला. त्यामुळे आता याच दर्जेदार खेळीला उजाळा देण्याचा त्याचा मानस आहे.

जायबंदी वाॅशिंग्टनला विश्रांती; शाहबाजला पदार्पणाची संधी : भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू वाॅशिंग्टन संुदर खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे ताे आता या वनडे मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या जागी संघामध्ये अष्टपैलू शाहबाज अहमदला संधी देण्यात आली. आता २७ वर्षीय शाहबाज वनडेत पर्दापण करणार आहे. त्याची यंदा आयपीएलमध्ये बंगळुरू संघाकडून १६ सामन्यांतील कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती.

बातम्या आणखी आहेत...