आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड सेफ्टी सिरीज व्यतिरिक्त इतर लीग खेळणार:धोनीसोबत निवृत्त झालेला रैना आयपीएलदेखील नाही खेळणार

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सुरेश रैना आता आयपीएलही खेळणार नाही. ३५ वर्षीय रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. रैना आता या महिन्यात सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लीजेंड्स संघात सामील होणार आहे. याशिवाय तो जगातील इतर लीगमध्येही सहभागी होणार आहे. धोनी आणि रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळायचा. त्याने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले असून १३६.७६ च्या स्ट्राइक रेटने ५५२८ धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...