आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Rajasthan Royals Vs Sunrisers Hyderabad Match 40th Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RR vs SRH LIVE:सनरायजर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय; मनीष आणि शंकरची शानदार अर्धशतके

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) दरम्यान दुबईत सामना झाला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने हैदराबादला 155 धावांचे लक्ष्य दिले होते. हैदराबादने 18.1 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठले. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

हैदराबादकडून मनीष पांडे आणि विजय शंकरने शानदार अर्धशतके लगावली. मनीष पांडेने 47 बॉलमध्ये 83 तर विजय शंकरने 51 बॉलमध्ये 52 रन केले. सामन्यात दोघांची 140 रनांची नाबाद पार्टनरशिप झाली. यापूर्वी जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार डेविड वॉर्नर आउट झाले. जोफ्रा आर्चरने दोघांची विकेट घेतली.

राजस्थानकडून कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. संजू सॅमसनने सर्वात जास्त 36 आणि बेन स्टोक्सने 30 रन केले. हैदराबादच्या जेसन होल्डरला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय राशिद खान आणि विजय शंकर ला एक-एक विकेट मिळाल्या.

पावर-प्लेमध्ये 47 रन बनले

राजस्थानची खराब सुरूवात झाली. रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्सने सांभाळून सुरुवात केली. पण, या सुरुवातील दोघे मोठ्या स्कोअरमध्ये बदलू शकले नाही.उथप्पा 19 रन काढून आउट झाला. यानंतर स्टोक्स आणि संजू सॅमसन आउट झाले. तोपर्यंत पावर-प्लेमध्ये 47 रन झाले होते.

स्टोक्स-सॅमसनने बाजू सांभाळली

पहिली विकेट पडल्यानंतर स्टोक्स-सैमसनने बाजू सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 56 रनांची पार्टनरशिप केली. सॅमसन 36 आणि स्टोक्स 30 रनांवर आउट झाला.

दोन्ही संघ

राजस्थान: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सैमसन (विकेटकीपर), स्टीव स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, शाहबाज नदीप, संदीप शर्मा आणि टी नटराजन.