आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाे-खो:राजपाल, रूपालीकडे औरंगाबादचे नेतृत्व

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सन २०२२-२३ ची पुरुष-महिला विभागाची ५८ वी राज्य अजिंक्यपद व संघ निवड चाचणी स्पर्धेचे ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा पुरुष-महिला संघ सहभागी होणार आहे. औरंगाबादच्या ३० सदस्यीय संघाची शुक्रवारी संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे यांनी घोषणा केली. पुरुष संघाच्या कर्णधारपदी राजपाल निकाळजे यांची, तर महिला संघाच्या कर्णधारपदी रूपाली वाघ हिची निवड करण्यात आली आहे. पुरुष-महिला संघास विश्वनाथ राजपूत यांच्यातर्फे गणवेश भेट देण्यात आला आहे.

संघाला जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे, राज्य संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष बालाजी सागर किल्लारीकर, उपाध्यक्ष सारिका भंडारी, ऋषिकेश जैस्वाल, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, बाळासाहेब कुबेर, मनोज पारधी, श्रीपाद लोहकरे, विनायक राऊत आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

औरंगाबादचे संघ : पुरुष - राजपाल निकाळजे, राहुल नाईकनवरे, वरद कचरे, योगेश भोगे, प्रमोद गुंड, आकाश खोजे, कृष्णा राठोड, सूरज चिरमाडे, अस्मित गावित, अभिषेक गावित, अमित हलदीकर, मयूर जाधव, शुभम जारवाल, उदय पगडे, अथर्व राऊत. व्यवस्थापक शिवाजी गोर्डे. महिला - रूपाली वाघ, पूजा सोळंके, भक्ती कुलकर्णी, अंजली गवळी, मनस्वी सावजी, पल्लवी चव्हाण, आकांक्षा हरकळ, सोजल जाधव, शर्वरी पाटील, प्रांजल सोनवणे, सीमा खान, अमृता माने, वेदिका गोर्डे, शुभांगी गोर्डे, साक्षी चौधरी. व्यवस्थापिका सुकन्या जाधव.

बातम्या आणखी आहेत...