आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rajvardhan, Sanchita, Riddhi In State Team In National Junior Group Netball Competition

नेटबॉल:राष्ट्रीय कनिष्ठ गट नेटबॉल स्‍पर्धेत राजवर्धन, संचिता, रिद्धी राज्य संघात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेटबॉल महासंघातर्फे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) पश्चिम बंगाल येथे २५ ते २८ डिसेंबरदरम्यान ३५ व्या राष्ट्रीय कनिष्ठ गट नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबादच्या तिघांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राजवर्धन इंगळे, संचिता म्हस्के, रिद्धी सोनवणे हे राज्याचे प्रतिनिधित्व करतील. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत या तिघांनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. सध्या राज्य संघाचे प्रशिक्षण शिबिर भंडारा येथे सुरू आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी हर्षवर्धन मगरे यांची नियुक्ती केली आहे. राजवर्धन हा सोनामाता विद्यालय, संचिता जिगीषा स्कूल, तर रिद्धी होलिक्रॉस मराठी स्कूलची खेळाडू आहे.

बातम्या आणखी आहेत...