आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वोत्तम स्ट्रायकर असूनही पोर्तुगालने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी गोन्झालो रामोसची निवड केली. त्यानेही निराश न होता हॅट्ट्रिक केली. २१ वर्षीय रामोसला जेव्हा जेव्हा संधी दिली जाते, तेव्हा तो नेहमीच मुख्य स्ट्रायकर म्हणून लक्ष्यवेधी कामगिरी करतो. अकादमीत असताना तो कधीही स्ट्रायकर म्हणून खेळला नाही. पण एकदा मुख्य स्ट्रायकर जखमी झाला व त्याला संधी मिळाली. त्याने २ गोल करत संघात आपले स्थान पक्के केले. आता तोच प्रकार मंगळवारी रात्री घडला. पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी रोनाल्डोला अंतिम-११ मधून वगळून रामोसचा समावेश केला. अकादमीप्रमाणेच बेनफिका स्ट्रायकरने राष्ट्रीय संघासाठी पदार्पणात ३ गोल केले. रामोसने १७ व्या, ५१ व्या, ६७ व्या मिनिटाला गोल केला. ही स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक आहे. हा रामोसचा पोर्तुगालकडून केवळ चौथा सामना होता. त्याच्यासह पेपेने ३३ व्या, रफाएल गुरेरोने ५५ व्या आणि राफेल लिआयोने ९०+२ मिनिटाला गोल केला. स्वित्झर्लंडसाठी मॅनुअल अकांजीने ५८ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. पोर्तुगालने ६-१ असा विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यापूर्वी पोर्तुगाल २००६ मध्ये चौथ्या क्रमांकावर आणि १९६६ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता.
रामोसचे वडीलही फुटबॉलपटू होते, वयाच्या १२ व्या वर्षी ओल्हानेन्स क्लबमध्ये दाखल रामोसने वयाच्या १२ व्या वर्षी त्याच्या मूळ गावी ओल्हानेन्स क्लबसाठी खेळण्यास सुरुवात केली. त्याचे वडील मार्को रामोस ही फुटबॉलपटू होते. वयाच्या १६व्या वर्षी रामोस युवा संघात मिडफील्डर म्हणून खेळायचा.
{ २०१९ मध्ये १९ वर्ष गट युरो कपमध्ये सर्वाधिक गोल केले. त्यानंतर पोर्तुगाल उपविजेता ठरला. जुलै २०२० मध्ये बेनफिकाच्या संघात दाखल. { या वर्षी सप्टेंबरमध्ये राफा सिल्वाच्या निवृत्तीनंतर प्रथमच नेशन्स लीगसाठी पोर्तुगालच्या वरिष्ठ संघात त्याची निवड झाली. { नोव्हेंबरला नायजेरियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याने वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ४-० च्या विजयात त्याने १ गोल, १ असिस्ट केला.
28 गोल झाले विश्वकपच्या १६ व्या फेरीत. १९८६ मध्ये प्री-क्वार्टर फायनल पद्धत सुरू झाल्यापासून सर्वाधिक. 39 वर्षे २८३ दिवसांचा पेपे विश्वचषकाच्या बाद सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
रामोसने ३ गोल करत २ विक्रम आपल्या नावे केेले { नॉकआऊटमध्ये हॅट्ट्रिक करणारा रामोस १९९० नंतरचा पहिला खेळाडू ठरला. तेव्हा झेकच्या थॉमस स्कुहारवीने अशी कामगिरी केली होती.
{ २००२ नंतर प्रथम एखाद्या खेळाडूने त्याच्या पहिल्याच विश्वचषकात हॅट्ट्रिक केली. तेव्हा जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजने अशी कामगिरी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.