आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rani Rampal Said Earlier People Only Used To See The Score In Olympics People Saw Our Effort Good Performance Encouraged By The Support Of The Countrymen; News And Live Updates

राणी रामपालची मुलाखत:पूर्वी लोक फक्त स्कोअर बघायचे; देशवासियांच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करण्यास मिळाले प्रोत्साहन

गाझियाबाद3 दिवसांपूर्वीलेखक: वैभव पलनीटकर
  • कॉपी लिंक
  • सामन्यानंतर पंतप्रधान मोदींनी संघाशी संवाद साधला. हा अनुभव कसा होता?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी यावेळी चांगली कामगिरी बजावली. या ऑलिम्पिकमध्ये महिला/पुरुष हॉकी संघासह इतरही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंनी 125 कोटी भारतीयांची मने जिंकली असून सर्वच स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष या ऑलिम्पिकमध्ये हॉकी महिला सघांनी अनेक वर्षानंतर उपांत्य फेरी गाठली. भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर आहे. याच पार्श्वभूमीवर दैनिक भास्कर समूहाकडून भारतीय महिला हॉकी संघाचे स्वागत करण्यात आले. यावेळी खेळाडूंना 26 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देऊन गौरव करण्यात आला आहे.

हा समारंभ रविवारी गाझियाबाद येथील सीआयएसएफ कॅम्पसमध्ये घेण्यात आला होता. यावेळी भास्कर प्रतिनिधीने महिला हॉकी संघाच्या कर्णधार राणी रामपालशी विशेष संवाद साधला. दरम्यान, राणी हीने ऑलिम्पिक, तिचे करिअर, क्रीडा क्षेत्रातील महिलांची स्थिती यावर आपली भुमिका मांडली आहे. तुम्ही पण वाचा हा विशेष संवाद....

प्रश्न : भारतीय संघाला ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट खेळ करुनही पदक जिंकता आले नाही. परंतु, तुम्ही सर्व भारतीयांची मने जिंकली. कांस्यपदकाचा सामना गमवल्यानंतर तुम्ही सर्वजण रडत होते. ते सर्व क्षण कसे आठवतात?
उत्तर
: टोकियो ऑलिम्पिकचा प्रवास आमच्यासाठी खूप चांगला होता. आम्ही सर्वजण स्पर्धेसाठी खूप तयारी केली होती. परंतु, कांस्यपदकाचा सामन्यासाटी आम्हाला मुकावे लागले. हा सामना हरल्यानंतर आम्ही प्रचंड भावूक झालो होतो. आम्ही सर्वजण भारतात आल्यानंतर सर्व भारतीयांचे मिळालेले प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला खूप आवडले. भारतीयांनी आमचा सामना सकाळी 6 वाजता उठून पाहिला. यामुळे भारतीय लोक हॉकीबद्दल जागरुक झाले असून महिलांनी हॉकीमध्ये प्राधान्य देत आहे.

दैनिक भास्कर समूहाकडून भारतीय महिला हॉकी संघाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रोत्साहन म्हणून 26 रुपये देण्यात आले.
दैनिक भास्कर समूहाकडून भारतीय महिला हॉकी संघाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रोत्साहन म्हणून 26 रुपये देण्यात आले.

प्रश्न : ऑलिम्पिकसाठी टोकियोला जाण्यापूर्वी तुमच्या मनात काय सुरु होते? यासाठी काही विशिष्ट ध्येय होते का? उत्तर : टोकियो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी आमच्या मनात केवळ यामध्ये सहभागी व्हायचे असे नव्हते. आपल्याला काहीतरी साध्य करायचे आहे. आपल्या देशासाठी पदके जिंकायची आहेत. आम्ही पदक जिंकले नाही, हे खरे आहे. परंतु, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. ऑलिम्पिकपूर्वीचा वेळ आपल्यासाठी सर्वोत्तम नव्हता. कारण एकीकडे, देशात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. अनेक लोक कोरोनामुळे आपले स्वकीय गमावत होते. आम्हीही अनेक दिवस बायो-बबलमध्ये राहून तयारी करत होतो. लोकांमध्ये खेळादरम्यान पॉझिटिव्हिटी आणणे हे आमचे ध्येय होते.

प्रश्न : सामन्यानंतर पंतप्रधान मोदींनी संघाशी संवाद साधला. हा अनुभव कसा होता?
उत्तर
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी उपांत्य फेरी आणि कांस्य पदक सामन्यानंतर संवाद साधला. ते म्हणाले की, तुम्ही लोक रडू नका. आपण हरलो नाहीये. जेंव्हा तुम्ही देशात याला तेंव्हा तुमचे स्वागत विजेत्यांसारखे केले जाईल. पंतप्रधानांच्या या शब्दांमुळे आम्हाला खूप प्रोहात्सान मिळाले.

प्रश्न : ऑलिम्पिकच्या पूर्वी आणि नंतर देशातील हॉकीसाठी बदललेले वातावरण तुम्हाला दिसत आहे का?
उत्तर
: अगदी. देशातील हॉकीसाठी वातावरणात बदल झाला आहे. कारण पूर्वी हॉकीबद्दल लोकांना एवढे काही माहित नव्हते. परंतु, आमच्या सामन्यादरम्यान, लोकांनी सकाळी सहाला उठून आमचा सामना पाहिला. आमचे प्रयत्न पाहिले आणि त्याचे कौतूक केले. यापूर्वी लोक केवळ स्कोर पाहायचे, परंतु, आता वातावरण पूर्णपणे बदलेले आहे. त्यामुळे मी सर्वच लोकांचे मनापासून आभार मानते.

प्रश्न : भविष्यातील नियोजन काय? पुढे वर्ल्ड कप आणि नंतर पॅरिस ऑलिम्पिक आहे?
उत्तर
: आशिया चषक विश्वचषकासाठी पात्रता सामना आहे. तर दुसरीकडे, आशियाई खेळ ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा आहे. सध्या या दोनच स्पर्धावर लक्ष असून या स्पर्धेत पात्र होणे यासाठी प्रयत्न सुरु आहे.

प्रश्न : खेळाबरोबरच प्रसिद्धीही येते. आपण दोन्ही कसे मॅनेज करता?
उत्तर
: आपल्याला जी प्रसिद्धी मिळते ती खेळामुळेच. म्हणूनच आमचे संपूर्ण लक्ष खेळावर असते. ते आजही आणि यापुढेही राहील.

बातम्या आणखी आहेत...