आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ranji Trophy Final \ Sarfaraz Khan Mumbai's Third Batsman To Score 900+ In Two Sessions Sarfaraz's Century; 937 Runs In The Session

शतक:रणजी ट्रॉफी फायनल सरफराज खान दोन सत्रांत 900+ स्कोअर करणारा तिसरा फलंदाज

बंगळुरू2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या सरफराजचे शतक; सत्रात 937 धावा

यंदा फाॅर्मात असलेल्या सरफराज खानने मुंबई संघाकडून रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत सलग चाैथ्या शतकाची नाेंद केली. याच खेळीच्या बळावर ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने रणजी ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात गुरुवारी मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात ३७४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्यांदा फायनल गाठणाऱ्या मध्य प्रदेश संघाने दिवसअखेर १ बाद १२३ धावांची खेळी केली. अद्याप २५१ धावांनी पिछाडीवर असलेल्या मध्य प्रदेश संघाचा सलामीवर यश दुबे (४४) आणि शुभम शर्मा (४१) मैदानावर कायम आहे. मुंबई संघाकडून तुषार देशपांडेने एक बळी घेतला. मुंबईकडून फाॅर्मात असलेला सरफराज हा दाेन सत्रांत ९००+ स्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी वसीम जाफर ( २००८-०९, १८-१९) आणि अजय शर्माने (१९९१-९२, ९६-९७, ) मध्ये असा पराक्रम गाजवला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई संघाने कालच्या ४ बाद २८४ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सरफराजने आपला झंझावात कायम ठेवताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, शम्स मुलाणी मोठी खेळी करू शकला नाही. ताे अवघ्या १२ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, मध्य प्रदेशच्या आक्रमक गोलंदाजीमुळे मुंबई संघाची मधली फळीही मोठी खेळी करू शकली नाही. मात्र, सरफराजने मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशची गोलंदाजी फाेडून काढताना शतकी खेळी केली. त्याने २४३ चेंडूंचा सामना करताना १३ चाैकार आणि २ षटकरांसह १३४ धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे आणि यंदाच्या सत्रातील सलग चाैथे शतक आपल्या नावे केले. तसेच ताे यामध्ये पहिल्यांदाच १५० पेक्षा अधिक धावांवर बाद झाला. मध्य प्रदेश संघाकडून गाैरवची गोलंदाजी लक्षवेधी ठरली. त्याने चार आणि अनुभवने तीन बळी घेतला. तसेच शारांशने दाेन आणि कुमार कार्तिकेयने १ बळी घेतला. त्यामुळे टीमच्या गोलंदाजांना समाधानकारक खेळी करता आली. टीमचा पार्थ अपयशी ठरला. त्याचा बळींचा प्रयत्न अपुरा ठरला. ब्रॅडमॅनशी होतेे सरफराजची तुलना: सुरुवातीच्या २५ प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

खेळाडू ब्रॅडमॅन सरफराज
डाव 46 36
नाबाद 9 6
धावा 3429 2485
सरासरी 92.68 82.83
100/50 13/9 8/7
सर्वाेच्च 452* 301*

सरफराज फाॅर्मात; सत्रात ९३७ धावा, गत वेळी ९२८ सरफराजच्या नावे सत्रात ९३७ धावांची नाेेंद झाली. त्याने गत सत्रातही ९००+ स्कोअर केला होता. त्याच्या नावे २०१९-२० मध्ये ९२८ धावांची नाेंद होती. दाेन सत्रांत ९००+ धावा करणारा ताे तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी अजय शर्माने १९९६-९७ मध्ये १०३३ व १९९१-९२ मध्ये ९९३ धावा काढल्या होत्या. वसीमच्या नावे २००८-०९ मध्ये १२६० आणि २०१८-१९ मध्ये १०३७ धावा काढल्या होत्या. आणि कुमार कार्तिकेयने १ बळी घेतला. त्यामुळे टीमच्या गोलंदाजांना समाधानकारक खेळी करता आली. टीमचा पार्थ अपयशी ठरला. त्याचा बळींचा प्रयत्न अपुरा ठरला.

यासह त्याने आपल्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे आणि यंदाच्या सत्रातील सलग चाैथे शतक आपल्या नावे केले. तसेच ताे यामध्ये पहिल्यांदाच १५० पेक्षा अधिक धावांवर बाद झाला. मध्य प्रदेश संघाकडून गाैरवची गोलंदाजी लक्षवेधी ठरली. त्याने चार आणि अनुभवने तीन बळी घेतला. तसेच शारांशने दाेन

बातम्या आणखी आहेत...