आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच महिन्यांनंतर दमदार पुनरागमन करताना ऑलराउंडर रवींद्र जडेजाने मंगळवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान तामिळनाडू संघाविरुद्ध १७ षटके गाेलंदाजी केली. मात्र, त्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न पहिल्या दिवशी अपयशी ठरला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या तामिळनाडू संघाने पहिल्या दिवसअखेर घरच्या मैदानावर साैराष्ट्र टीमविरुद्ध पहिल्या डावात ४ बाद १८३ धावा काढल्या. दुसरीकडे केदार जाधव (१२८) आणि साैरभ नवलेने (नाबाद ५६) शानदार खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३१४ धावा काढता आल्या. सध्या महाराष्ट्र संघाचा साैरभ आणि अक्षय पालकर (३२) मैदानावर कायम आहेत. यजमान मुंबई संघाकडून घरच्या मैदानावर तुषार देशपांडे, माेहित अवस्थी आणि शम्स मुलाणीने प्रत्येकी २ बळी घेतले. यादरम्यान महाराष्ट्र संघाचा सलामीवीर पवन शहा शून्य आणि कर्णधार अंकित बावणे (१) स्वस्तात बाद झाला. तसेच मुंबई संघाच्या सलामीवीर सिद्धेश वीरचे अवघ्या २ धावांनी अर्धशतक हुकले. ४८ धावांवर असताना त्याला मुलाणीने बाद केले. त्याची यादरम्यानची कामगिरी लक्षवेधी ठरली.
जडेजावर खास नजर :
आगामी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसाेटी मालिकेच्या तयारीसाठी रवींद्र जडेजा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याला तब्बल पाच महिन्यांनंतर दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळाली. यासाठी त्याच्याकडे साैराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.