आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ranji Trophy | Mumbai To Pack Up; Maharashtra's Challenge From Today, The Seventh And Last Round Starts From Today

रणजी करंडक:मुंबईवर पॅकअपचे सावट; आजपासून महाराष्ट्राचे आव्हान,  सातव्या अन् शेवटच्या फेरीला आजपासून सुरुवात

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेश, बंगाल, कर्नाटक, साैराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीमध्ये जडेजाच्या नेतृत्वात खेळणार साैराष्ट्र संघ

यजमान मुंबई संघाला घरच्या मैदानावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारपासून रणजी करंडक स्पर्धेच्या सातव्या शेवटच्या फेरीला सुरुवात हाेत आहे. आता ११ संघांमधून उपांत्यपूर्व फेरीसाठी चार संघ पात्र ठरणार आहेत. यासाठीच आजपासून झुंज रंगणार आहे. मुंबईची उपांत्यपूर्व फेरीतील वाट अधिकच खडतर मानली जात आहे. सध्या महाराष्ट्र संघाची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. मध्य प्रदेशसह कर्नाटक, साैराष्ट्र आणि बंगाल संघाने अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला आहे.

अ गट : टॉप बंगाल अव्वल, उत्तराखंड-हिमाचल चुरस
अ गटातून बंगाल संघाने अव्वल स्थान गाठून उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला. आता दुसऱ्या स्थानावरील संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठता येईल. यासाठी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्यात चुरस रंगणार आहे. उत्तराखंडचा सामना हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचा सामना उत्तर प्रदेशशी हाेणार आहे. या सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवण्यासाठी झारखंड आणि हिमाचल प्रदेश संघ उत्सुक आहे. याचा त्यांना फायदा हाेणार आहे. यातील विजेता संघ दुसऱ्या स्थानी दाखल हाेईल. यातून ताे संघ अंतिम आठसाठी पात्र ठरू शकणार आहे. त्यामुळे आता यासाठी संघांमध्ये चुरस रंगणार आहे.

ब गट : मुंबई-महाराष्ट्र लढत; पुढचा संघ निश्चित
ब गटात दुसऱ्या स्थानी विराजमान हाेण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र संघांमध्ये झंुज रंगणार आहे. या सामन्यातील िवजेत्या संघाला अंतिम आठमध्ये दिमाखदारपणे प्रवेश करता येईल. महाराष्ट्र संघ २५ गुणांसह दुसऱ्या आणि मुंबई २३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. यातील विजेता संघ दुसऱ्या स्थानी दाखल हाेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर संघाला आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा साैराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. साैराष्ट्रचा सामना चेन्नईतील मैदानावर यजमान तामिळनाडू टीमविरुद्ध रंगणार आहे.

क गट : दुसऱ्या स्थानासाठी चार संघांमध्ये खास चुरस
कर्नाटक संघाने २९ गुणांसह क गटातून उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला आहे. आता दुसऱ्या स्थानावरून या फेरीतील प्रवेशासाठी चार संघ शर्यतीत आहेत. यामध्ये झारखंड, केरळ, राजस्थान आणि गाेवा संघांचा समावेश आहे. झारखंड संघाला कर्नाटकच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हा सामना ड्राॅ करूनही झारखंड संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल. मात्र, यासाठी राजस्थान आणि केरळ सामन्याचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगेकूचसाठी राजस्थान आणि केरळला आजपासून करा वा मरा असे आहे. राजस्थान संघाला बाेनस गुणांच्या बळावर पुढची फेरी गाठता येईल.

ड गट : मध्य प्रदेश पात्र; विदर्भ-पंजाब संघांत चुरस
मध्य प्रदेश संघाने ड गटात अव्वल स्थान गाठून उपांत्यपूर्व फेरीचा प्रवेश जवळपास निश्चित केला. आता दुसऱ्या स्थानावरून ही फेरी गाठण्यासाठी विदर्भ आणि पंजाब यांच्यात चुरस रंगणार आहे. विदर्भ संघाविरुद्धचा विजय वा ड्राॅदेखील पंजाबला पुढची फेरी गाठून देऊ शकणार आहे. तसेच बाेनस गुणांच्या बळावर विदर्भ संघाला पुढची फेरी गाठण्याची माेठी संधी आहे. यासाठी टीमच्या खेळाडूंना सर्वाेत्तम कामगिरी करावी लागणार आहे. यातून टीमला स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवता येणार आहे. गत चॅम्पियन मध्य प्रदेश संघाने सर्वाेत्तम खेळी करताना हा पल्ला यशस्वीपणे गाठला आहे.

गुणाकंन
6 गुण
विजय
3 गुण
पहिल्या डावात आघाडी

1 गुण
ड्रॉ ( डावात पिछाडी)
ड्रॉ (पहिला डाव अपुर्ण)
बोनस- १० विकेट वा डावाने जिंकणाऱ्यास १ बाेनस गुण

बातम्या आणखी आहेत...