आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ravele Steps Into Shooting With Mother's Support; Her Testimony Will Lead To An Olympic Medal!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर्स डे विशेष:आईच्या पाठबळाने नेमबाजीत राेवले पाऊल; तिच्या साक्षीने ऑलिम्पिक पदकाने गाठणार यशाेशिखर!

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आईला ऑलिम्पिक पदकाची भेट देण्याचा शूटर तेजस्विनीचा निर्धार

(एकनाथ पाठक)

आई सुनीता यांच्याच पाठबळामुळे मला नेमबाजीसारख्या अवघड खेळामध्ये मजबूतपणे पावले राेवता आली. संकट आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ती वेळाेवेळी मला मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. आज तिच्याचमुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचा माेठा पल्ला गाठता आला. आता तिच्याच साक्षीने क्रीडाविश्वातील सर्वात माेठ्या इव्हेंट ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून यशाेशिखर गाठण्याचा निर्धार असल्याचे आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंतने मदर्स डेनिमित्त “दिव्य मराठी’ला सांगितले. ऑलिम्पिक पदकाची सर्वात माेठी भेट मला आईला द्यायची आहे. त्यासाठीच्या खडतर प्रवासात यशस्वी व्हावे म्हणून मी तिच्याच समक्ष घरी कसून मेहनत घेत आहे. आईमुळे मला हे यश संपादन करता आले. तिला वेगळी आणि अविस्मरणीय ठरणारी भेट मी देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ती या वेळी म्हणाली. ऑलिम्पिकचा काेटा मिळवणारी नेमबाज तेजस्विनी सध्या माहेरी काेल्हापुरात स्पर्धेची तयारी करत आहे. लाॅकडाऊनमुळे ती काेल्हापुरात आहे.

आवडीच्या पदार्थाने सेलिब्रेशन स्पर्धेमुळे मला बऱ्याच वेळा घरी राहता आले नाही. मात्र, आता मदर्स डे आईसाेबत साजरा करण्याची संधी आहे. आवडीचा पदार्थ करून मी तिच्यासाेबत याचे सेलिब्रेशन करणार आहे. तिच्यासाठी हीच आज माेठी भेट असेल, असेही ती म्हणाली.

जिद्दीला सलाम, त्यामुळे सरस :

तेजस्विनीमध्ये प्रचंड जिद्द, संयम आणि मेहनत घेण्याचा गुण आहे. यातून तिने कष्ट घेऊन ऑलिम्पिकचा काेटा मिळवला. तिच्या या जिद्दीला सलाम. त्यामुळे ती सरस ठरते, अशा शब्दांत आई सुनीता सावंत यांनी मुलीवर काैतुकाचा वर्षाव केला.    

बातम्या आणखी आहेत...