आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसेंदिवस वाढत चाललेल्या T-20 लीगमुळे क्रिकेटची वाटचाल फूटबॉलच्या मार्गावर होत आहे, त्यामुळे भविष्यात क्रिकेटपटूंना केवळ जागतिक स्पर्धा खेळण्यातच रस वाटेल, दुसरीकडे याचा परिणाम द्विपक्षीय मालिकेवर होईल, अशी चिंत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.
जगभरातील वाढत्या T-20 लीगचा फटका द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला बसत आहे. जास्त करून यात एकदिवसीय क्रिकेट (वन-डे) भरडले जात आहे. खेळाडूंशी प्रदीर्घ कालावधीच्या डील केल्या जात असल्याने लीगमधील संघांचेही महत्त्व वाढणार आहे, अशी शंकाही शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केली.
परिणाम, या सर्व प्रकारामुळे खेळाडू केवळ विश्वचषक स्पर्धेसाठीच राष्ट्रीय संघात एकत्र येतील. अर्थात, यासाठी संघांनी खेळाडूंना मुक्त करायला हवे. खेळाडूंनी मुक्त केल्यानंतरच ते विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतील, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. अर्थात, अशी शक्यता प्रत्यक्षात आल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही किंवा मला वाईटही वाटणार नाही, असेही शास्त्री म्हणाले.
याचा सर्वाधिक फटका वन-डे ला होईल
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना शास्त्री म्हणाले, याचा सर्वात मोठा फटका एकदिवसीय क्रिकेटला बसेल. आताच अनेक क्रिकेटपटू देशापेक्षा क्लबकडून खेळण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. खेळाडूंमधील ही भावना भविष्यात वाढीस लागणार यात तिळमात्र शंकाच नाही, असे शास्त्री म्हणाले.
IPL संघ जगभरातील इतर फ्रँचायझी खरेदी करू पाहतेय- टॉम मूडी
ESPNcricinfo च्या रनवॉर्डर कार्यक्रमात, सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी म्हणाले, आम्ही याविषयी बोलत आहोत. कारण, आयपीएल संघांना जगभरातील इतर फ्रँचायझी विकत घ्यायच्या आहेत. असे करणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसू शकते, परंतु ते दीर्घकालीन फायद्याकडे पाहत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.